Saidabad News -अजय कंडेवार,वणी :- शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कायर गावाजवळील सैदाबाद शेतशिवारा मार्गे आदिलाबाद येथे अवैधरित्या वाहतूकीत जाणाऱ्या गोवंश तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला असून घटनास्थळावरून 4 लाख रू पिकअप वाहन व 98 हजार रुपये किमतीचे 8 नग गोवंशाची सुटका करून स्पॉट वरच गाडी भरतांना दोघांना अटक करीत एकूण 4 लाख 88 हजार रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.Beef “smugglers” were caught “red-handed” by the police.
शिरपूर पोलीस कर्तव्यावर असताना गुप्त बातमीदारांकडून कायर गावाजवळील सैदाबाद शेतशिवारा मार्गे आदिलाबाद मार्गावरून काही व्यक्ती जनावरांना घेऊन जात असल्याची माहिती 5 एप्रिल रोजी मिळाली. त्यावरून PSI बुधवंत यांनी तात्काळ शिरपूर ठाणेदार A.P.I माधव शिंदे यांना याबाबत कळविले. यावरून कायर गावाजवळील सैदाबाद शेतशिवारा मार्गेजाणाऱ्या रस्त्याजवळ सापळा रचला.रात्री 9 वाजताचा दरम्यान 2 ईसम हे 8 गोवंशीय जनावरांना पिकअप क्र.MH29 -B- 6812 वाहनात जनावरांना गाडीत टाकत असतांना दिसले व त्यासोबत एक दुचाकी वाहन क्र .MH-29-CD-7163 पोलिसांनी त्यांना थांबवून विचारले असता त्यांनी ही सदर जनावरे बाजारातून कत्तलीकरिता नेत असल्याची माहिती पोलिसांना दिली.शिरपूर पोलिसांनी जनावर तस्करांच्या ताब्यातून 8 गोवंश बैलांची सुटका करून चारापाण्या व्यवस्था नसल्यामुळे गोरक्षण ट्रस्ट येथे पाठविले. तसेच महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांच्या कत्तलीवर प्रतिबंध असताना कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक करणारे संशयित बालाजी हरिदास मोहितकर 44 व गौरव बालाजी मोहितकर 23, दोघेही रा.रुईकोट, ता.झरी, जिल्हा यवतमाळ असे नाव आहे .यांच्या विरुद्ध प्राण्यांचा क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम चे कलम 11(1),(D)11(1)(E),11(1)(H) व अधिनियम कलम 5 (À), 5 (B), 9, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119, या आरोपीविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Dysp गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई शिरपूर ठाणेदार API माधव शिंदे यांच्या सूचनेनुसार PSI बुधवंत व बीट जमादार यांनी केली .