अजय कंडेवार,Wani :- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी शाळेच्या वडगाव कॅम्पसमध्ये हेड बॉय आणि हेड गर्ल”या पदासाठी 2024-25 या सत्राकरिता मॅकरून शाळेचा मुख्याध्यापिका शोभना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना लोकशाहीतून होणाऱ्या देशातील निवडणुका शालेय जीवनातच समजाव्यात यासाठी हा प्रयोग करत ही एक आगळवेगळी (cabinet) शालेय निवडणूक दि.13 जुलै ला (cabinet) मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली व खातेवाटपही करण्यात आले.
या सर्व उमेदवारांसाठी निवडणुक चिन्हे देण्यात आली होती, तर शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे ओळखपत्र तपासून त्यांच्या बोटाला शाई लावून मोबाईलवरील चिन्हासमोरील नावापुढे बटन दाबण्यास सांगण्यात आले. यासाठी 2 दिवस प्रचार करून प्रत्येक जण आपापल्या उमेदवाराचे चिन्ह घेऊन प्रचार प्रमुखांच्या बरोबर प्रत्येक वर्गात जाऊन सभा घेतल्या .मैदानावर, शाळेच्या हॉलमध्ये जाऊन उमेदवारांनी आप-आपल्या परीने विद्यार्थी मतदारांना जागरूक राहून मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. येलो, ग्रीन, ब्ल्यू,या तिन्ही हाऊसमधील विद्यार्थी आपापल्या परीने प्रचार करत होते. भविष्यात मी तुमच्यासाठी काय काय काम करेन? याची आश्वासक यादी सर्व विद्यार्थ्यांना सांगत होते. आपापल्या निवडणुकीच्या चिन्हाबरोबर प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी मुलांची मने तर जिंकली.
या निवडणुकीत मुख्यमंत्री (हेड बॉय) किंवा शाळा नायक – आर्यन खांगर आणि उपमुख्यमंत्री(हेड गर्ल) किंवा शाळा नाईका – गयेशा नगराळे हे म्हणून विजयी झाले.शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करीत खातेवाटपही करण्यात आले. क्रीडा नायक -अनुज सिंह ,क्रीडा नायिका – नेहारिका महाकारकर , संघ नायक – चैतन्य मत्ते ,अंश आंदे , ऋग्वेद भावसार ,रुद्राक्ष राखुंडे संघ नायिका – सई दामोधर , अक्सा शेख, श्रेया सातपुते , अर्णवी खडसे शालेय शिक्षण विभाग -श्रेयश साव, प्रतीनी नागपुरे .शालेय शिस्त प्रशासन विभाग -आदित्य वैद्य , सिया साधवाणी.शालेयआपत्ती विभाग – शिवम सिंह , अमृता ताजने.शारीरिक स्वास्थ्य विभाग-नृशिल चारनिया , ईशा ढुमने.शालेय निसर्ग संरक्षण विभाग -आर्यन सिंह , कृतिका आंबेकर . विशेषतः शालेय मंत्रिमंडळाचा सर्व उमेदवारांचा शाळेचे मुख्याध्यापिका शोभना मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शारीरिक शिक्षक सुधीर लडके, नितेश कुरेकर ,भुदेव सिंह , शुभम मदान , राकेश पाल , अमित मिश्रा ,राजीव घुगुल,संजय सिंह , विवेक देशपांडे ,वैभव दहेकर ,सुमित भालेराव, संगीता पवार , शेख व रुपाली घाटे या सर्व शिक्षकवृंदांचे सहकार्य लाभले.
•असा पार पडला हा उपक्रम…….
“सर्व शिक्षकांनी आपापल्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना मतदानाबाबत माहिती दिली. या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सहशालेय उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने शाळा- शाळांमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निर्मिती केली जाते. प्रत्येक वर्गातून दोन वर्ग प्रतिनिधींची निवड करून त्यांच्यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली.