अजय कंडेवार,Wani:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हा सामाजिक न्याय आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजय नगराळे यांनी आपला राजीनामा १९ जून २३ रोजी पाठविण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात होता .वणी उपविभागातील तडफदार नेते म्हणून ते जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. त्यांनी मागील महिन्यात जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षांतर्गत वादातून दिल्याचीही चर्चा रंगली होती .परंतु सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंडित कांबळे यांनी जिल्हाध्यक्ष विजय नगराळे यांचा राजीनामा नामंजूर करून त्यांना त्याच पदावर कायम राहुन पक्षाचे काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत रहा. असा स्पष्ट आदेश दिला आहे.या आदेशावरून रा.श.प गटात ऐन विधानसभा निवडणुकीचा तोंडावर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः वणी विभागात कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.Finally, the resignation of District President Vijay Nagarle of NSP group was rejected..
•लोकसभा निवडणुकीच्या काळात निभावली जिम्मेदारी त्याचेच प्रतिफळ….
“नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी महाविकास आघाडीमध्ये राहून बणी उपविभागात अनेक ठिकाणी स्वतः काहीं कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार सभाही घेतल्या होत्या. तसेच महविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा प्रत्येक सभेत नगराळे यांची विशेष उपस्थिती होती.विजय नगराळे यांच्यावर शरद पवार गटाने मोठी जबाबदारी टाकली होती, त्यामुळे नगराळे हे नेहमीच पक्षातील वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून कामाची आखणी करून पूर्ण करायचे. गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर विजय नगराळे हे शरद पवार गटासोबत एकनिष्ठ राहिले होते. त्यामुळे शरद पवार गटाने त्यांच्यावर मोठी जबाबदारीही टाकली होती. त्या जबाबदारीने त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी ही निर्माण केली होती.”
“वरिष्ठांनी माझावर टाकलेला विश्र्वासाबद्दल मी त्यांचा वृणी आहे. मी नेहमीच पक्षाचा आदेशाचे पालन केले आणि समोरही करणारच. येत्या काळात सामाजिक न्याय विभाग वाढीकरिता प्रयत्न करेल. मला परेंट्स बॉडीची ही जबाबदारी आहे त्यातही मी आपले नेहमी योगदान दिले आणि यापुढेही देणार आणि पक्षाचा कामाला नेहमी अग्रेसर असणार अशी मी ग्वाही देतो.- जिल्हाध्यक्ष विजय नगराळे (सामाजिक न्याय विभाग ,यवतमाळ)