•जि. प. शाळा झरी येथील प्रकार.
देव येवले, झरी:- तालुक्यात जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती अतिशय बिकट आहे. कुठे विद्यार्थी आहे तर शिक्षक नाही, कुठे शिक्षक आहे तर विद्यार्थी नाही. कुठे 4 वर्ग पण शिक्षक मात्र 2, तर बहुतांश शाळेत शिक्षकांनी वेळेवर हजर राहत नसल्याने कित्तेक शाळेचा अभ्यास हा राम भरोसे सुरु असल्याचे निदर्शनात येत आहे.


झरी येथे जिल्हा परिषद शाळेत स्थानिक अनिल पोयाम यांनी भेट दिली असता. कार्यालयीन वेळेत एकही शिक्षक उपस्थित नसल्याचे दिसून आले. या शाळेत 4 वर्ग असून त्याची जबाबदारी ही दोन शिक्षकांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे चार हि वर्गाच्या मुलांना एकाच वर्ग खोलीत शिकवणी सुरु असल्याने, कुणाला काय शिकवत असेल हि शंकाच, प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम वेगवेगळा असून, हे सर्व मिश्र शिक्षण या मुलांना झेपत असेल असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सर्व सामान्य गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.


ही शाळा तालुक्याच्या ठिकाणी असून शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी याची साधी भेट सुद्धा शाळेला होत नसल्याचे बोलले जात असून एकही वरिष्ठ अधिकारी या कडे लक्ष देत नाही. हे विशेष




