Vidarbh News ,Wani : मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतील बंदी-वाढोणा परिसरात एका राजकीय गटाशी जवळीक असल्याचे बोलल्या जाणाऱ्या “त्या रंगील्या” समर्थकाबाबत सध्या गावात मोठ्या प्रमाणावर चर्चा दिसत आहे. काही दिवसांपूर्वी नव्याने घेतलेल्या बुलेट सोबत एका राजकीय गटाचा नेत्यांसोबतचे फोटो सेशन ने त्याचा आत्मविश्वास “सातव्या” आसमानावर गेल्याचे बोलले जात होते.

बंदी वाढोणा परिसरात एका राजकीय गटाशी जवळीक असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या “तो वकटवाणा लखन” ” या स्वंयघोषित समर्थकाचा सध्या गावात आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. ‘या वकटवाण्या लखन” ने आपल्या वयाचा अंदाज न करता एका अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
गेल्या काही महिन्यांत ‘या वकटवाण्या लखनने‘ एका गटाचा राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले होते. त्यामुळे तो त्या गटाचा सक्रिय समर्थक असल्याची चर्चा परिसरात होत होती. मात्र, अलीकडे समोर आलेल्या प्रकरणानंतर त्याच फोटोंची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.राजकीय नेत्यांसोबत फोटो असणे म्हणजे त्या व्यक्तीच्या वैयक्तिक वर्तनाची किंवा कृतीची जबाबदारी संबंधित नेत्यांवर येतेच असे नाही. तरीही, सोशल मीडियावर अनेक नागरिकांकडून अशा व्यक्तींना राजकीय पाठबळ मिळते का, असा प्रश्न उपस्थित केला. “या वकटवाण्या समर्थकावर” पोस्कोचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा मुकुटबन ठाण्यात दाखल झालेला आहे . यापूर्वीही दीडवर्ष अगोदर असंच एक प्रकरण समोर येणार होतं अशी देखील चर्चा आहे, त्यामध्ये काहीतरी लक्ष्मीदर्शन झाल्याने प्रकरण दाबल्या गेल म्हणून ते दीड वर्षाअगोदरच ‘रंगीला’ प्रकरण समोर आलं नाही परंतु दीड वर्षानंतर याचा माज शेवटी समोर आलाच अशीही चर्चा आहे.म्हणून आता असं म्हणायला हरकत नाही की,गावचा अनधिकृत नेता निघाला “रंगीला…..”.

