Wednesday, April 15, 2026
HomeBreakingमुकूटबन पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह...?

मुकूटबन पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह…?

Ajay Kandewar : वणी पासून जवळ असलेल्या मुकूटबन पोलीस स्टेशनकडून अवैध जुगार आणि गोवंश तस्करीविरोधात करण्यात आलेल्या नाममात्र धडक कारवाईनंतर परिसरात उलट चर्चा रंगू लागली आहे.पोलिसांनी सलग दोन दिवसांत छापे टाकत जुगार अड्ड्यावरून रोख रक्कम जप्त केली तसेच गोवंश तस्करी प्रकरणी वाहनासह मुद्देमाल जप्त केला. मात्र, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. ही खरच कारवाई आहे का वसुली बहाद्दर कुल “दीपकाचा” कारवाईपासून वाचण्याचा कारनामा आहे.हे कोडे मात्र न उलगडणारे आहे.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यांपासून वरळी मटका व्यवसायावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नव्हती. परिसरात अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतानाही पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांमध्ये केला जात होता.दरम्यान,वाढत्या अवैध व्यवसायाबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरच अचानक कारवाईला वेग आल्याचे बोलले जात आहे. काहींच्या मते, ही कारवाई केवळ दिखाऊ स्वरूपाची असून मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पोलिस वर्तुळातही या कारवाईला वेगळी कलाटणी देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. तथापि, यासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.विशेष म्हणजे, सहा महिन्यांच्या कथित निष्क्रियतेनंतर अचानक झालेल्या कारवाईमुळे जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे.जर अवैध व्यवसाय इतक्या काळ सुरू होते, तर त्या काळात पोलीस प्रशासन काय करत होते, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली असून,अवैध धंद्यांना खरंच आळा घालायचा असेल तर सातत्यपूर्ण आणि निष्पक्ष कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.या सर्व घडामोडींमुळे मुकूटबन पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत शंका उपस्थित होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे. वसुली बहाद्दर कुल ” दीपक” च्या कार्यप्रणालीची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ धजावतील का ? या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.

@ अधिकाऱ्याचे लक्ष विचलित करण्यासाठी कुलदीपकने रचलेला डाव…..?

संबंधित दोन्ही (मटका आणि गोवंश तस्करी) कारवायांमध्ये मुख्य चालकाचा अभाव हा केंद्रस्थानी प्रश्न निर्माण करतो. दोन्ही कारवायांकडे पाहिलं तर एक गोष्ट ठळक दिसते.खरा मालक, खरा चालक कुठेच दिसत नाही. नाव मात्र नेहमी गाडी चालवणाऱ्याचं, छोट्या माणसाचंच. त्याच्यावर गुन्हा टाकायचा आणि मोठे लोक मोकळे.हे असंच अपघाताने होत नाही. काहीतरी थातूर-मतुर कारवाई केली कारण वरिष्ठाना impress करणे हा तर जुना खेळच आहे.नवीन अधिकारी आला की,त्याचं लक्ष इकडं-तिकडं वळवायचं, आपल्या मुठीत घ्यायचं आणि कागद रंगवून कारवाई दाखवायची आणि मूळ खेळ करणारा बाजूला ठेवायचा.हा सगळा डाव आखलेला वाटतो.आणि या सगळ्या खेळामागे दोऱ्या हलवणारा कुणीतरी आहे आणि लोकांच्या बोलण्यात तोच नाव पुढं येतं.कुल “दीपक” नवीन अधिकाऱ्याला गुंतवून ठेवायचं आणि स्वतःचा धंदा चालू ठेवायचा, एवढाच खरा खेळ दिसतो.

(टीप:- सदर बातमीत cartoon AI इमेज वापरण्यात आलेला आहे.)

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page