Sunday, May 3, 2026
HomeBreaking Newsयवतमाळ जिल्ह्यात मॅकरून शाळेचा "डंका".....!

यवतमाळ जिल्ह्यात मॅकरून शाळेचा “डंका”…..!

•"आर्या " ने घेतली विभागीयस्तरासाठी "झेप "

Ajay kandewar,Wani : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांचे द्वारा आयोजित १४ वर्षाखालील गटातील मुले व मुलींकरिता जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा ५ ऑगस्ट रोजी मारेगाव येथे संपन्न झाले .या स्पर्धेत मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी (CBSE) शाळेचा विद्यार्थिनी आर्या तिमांडे इयत्ता आठवी हिने यवतमाळ जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावित विभागीय स्पर्धेसाठी झेप घेतली आहे.

या स्पर्धेत जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधून प्रत्येकी ५ खेळाडू अशा एकूण ८० स्पर्धकांनी सहभाग दर्शविला.प्रत्येक खेळाडूंनी बुद्धिमत्तेचा आधार एकमेकांना कडवी झुंज देत उच्चतम क्षमता दाखविण्याचा प्रयत्न केला. यात विशेष चातुर्यबुद्धी वापरून “आर्या” हिची जिल्हास्तरीय अंतिम सामन्यात द्वितीय स्थान विजय संपादन करून विभागीय स्तरावर निवड करण्यात आली.शाळेचे संस्थापक पी. एस.आंबटकर व मुख्याध्यापिका शोभना यांनी विद्यार्थींनीचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीचा शुभेच्छा दिले.

•खेळातून सर्वांगीण विकास

खेळातून व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होत असून बुद्धिबळाच्या सरावातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतांसह त्यांच्यातील निर्णय क्षमतांचा विकास होत असल्याचे मत संस्थेचे संस्थापक पी.एस.आंबटकर यानी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page