Sunday, May 3, 2026
HomeBreakingशेतात "धम्मरत्न" चा अंगावर वीज पडली......!

शेतात “धम्मरत्न” चा अंगावर वीज पडली……!

•वीज पडून १ ठार, २ जखमी.

Ajay kandewar,Wani : तालुक्यातील तेजापूर येथील अडेगाव शिवारातील शेतात काम करत असताना अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी शेतात असलेल्या गाईचा गोठ्यात तिघे उभे असताना एक २५ वर्षीय युवा शेतकऱ्याचा अंगावर वीज पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. ही घटना आज (दि.६) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तेजापूर येथील युवा शेतकरी शेतात कामाकरीता आले. दरम्यान कायर परिसरातील तेजापूर गावात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात वीज पडून धम्मरत्न सुधाकर भगत (वय २५)  हा युवा शेतकरी जागीच मृत्युमुखी पडला. त्यांच्यासोबत काम शेतात करणारे गजानन कोंडेकर (२२) व पूनम मालेकर(२३)हे जखमी झाले. त्यांना वणी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page