वणी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चातर्फे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त ग्रामीण रुग्णालय, वणी येथे सकाळी ११ वाजता रुग्णांना फळवाटप करण्यात येणार असून, वाघधरा येथील अपंग निवासी शाळेत दुपारी १२ वाजता विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमाचे आयोजन भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. पवनराम एकरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, समर्पण आणि जनकल्याणाचा संदेश देणारे हे उपक्रम राबविण्यात येत असून, संबंधित लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

