Vidharbh News l वणी :- येथून जवळच असलेल्या झरी जामणी तालुक्यातील मुकुटाबन ग्राम पंचायत समोर स्थानिक एका दिव्यांग व्यक्तीने सांड पाणी वाहून नेणाऱ्या नालीच्या चेंबरवर अतिक्रमण झाल्याने पाणी साचून इतरांना त्रास वाढला आहे. त्यासाठी मागील अनेक दिवसापासून संबंधितांवर कारवाईची मागणी केल्या जात असून ग्राम पंचायत दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी एका दिव्यांग व्यक्तीला आज ता. २३ रोजी सकाळी १० वाजता पासून आमरण उपोषण सुरू करावे लागले आहे..
मुकुटबन पाण्याच्या टाकी जवळील परिसरात राहणारे संभाजी गोविंदा पारशिवे नामक दिव्याग व्यक्तीचे घर आहे. यांचे घराशेजारी आलेल्या मार्गालगत सांडपाणी वाहून नेणारी गटार बंद नाली आहे. त्या नालीचे चेंबरवर शेजारी राहत असलेल्या ग्रामस्थानी अतिक्रमण केले असून नालीले चेंबर बंद केले आहे. त्यामुळे वाहून जाणारे घाण पाण्याची कोंडी होत असल्याने शौचालय व स्नान गृहाचे पाणी उलट बाहेर येत असल्याने घरात व घराच्या परिसरात घाण पसरत आहे. या गंभीर बाबिबाबत अनेकदा या व्यक्तीने ग्राम पंचायत मुकुटबन यांचेकडे निवेदन देवून कारवाईची मागणी केली आहे.
परंतु ग्राम पंचायतीच्या बेशिस्त व डोळे झाक धोरणामुळे सातत्याने दुर्लक्ष केल्या जात होते. त्यामुळे या दिव्यांग व्यक्तीने आज पासून ग्राम पंचायत कार्यालयाचे समोर आमरण उपोषण सुरू केल्याने ग्राम पंचायतीच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असे गावात चर्चा सुरू झाली आहे.