Wani l अजय कंडेवार:- तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायत ही मोठीं ग्रा.पं म्हणून ओळखली जाते तसेच आर्थिक उत्पन्नातही अग्रेसर असल्याचे म्हंटले जाते परंतु गावातील स्वच्छतेबाबतीत उपाययोजनात माञ शून्य असल्याचे एक स्पष्ट विदारक चित्र समोर आल्याचे दिसून आलें “नाम बडे… दर्शन खोटे”अशी या ग्रामपंचायतची स्थिती आहे. कारण गावअंतर्गत येणाऱ्या मेघा इंडेन गॅसचा ऑफिस लगतच्या खुल्या प्लॉट मध्ये योग्य ती काळजी न घेतल्याने मागील वर्षापासून ठेवण्यात आलेल्या कुजलेल्या टायरचा मोठा साठा, अनावश्यक झाडें झुडुपे वाढली आहे व पावसाचे पाणी टायरच्या डबक्यात साचल्याने डासांची संख्या वाढून व्यावसायिकांचे, ग्राहकांचे व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करून देखील चिखलगाव ग्रामपंचायत प्रशासन मुंग गिळून असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सचिव, सरपंच आजारांचा प्रकोप वाढल्यानंतर “त्या खुल्या प्लॉट मालकावर” कारवाई करेल का अशी आर्त हाक व्यावसायिक व नागरीकांकडून बोलल्या जात आहे .
चिखलगावात मध्ये प्रापर्टीच्या नावावर अनेकांनी खुले प्लॉट खरेदी करून ठेवले आहेत. मात्र, हे आजघडीला परिसरातील नागरिकांसाठी व व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. खुल्या प्लॉटात कचऱ्यांच्या ढिगाऱ्यामुळे,अनावश्यक झाडें झुडुपे व पावसाचे पाणी टायरच्या डबक्यात साचल्याने डासांची संख्या वाढून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. प्लॉट मध्ये संबंधित मालकांनी भूखंडाची/खुल्या प्लॉटची स्वच्छता करणे गरजेचे देखिल असते अन्यथा ग्राम प्रशासनाकडून कारवाई जाते परंतु ग्रा.पं.चिखलगाव हद्दीत तसे मागील वर्षापासून काहीं होतांना दिसत नाहीत. कारण गावअंतर्गत येणाऱ्या मेघा इंडेन गॅस एजंसीचा ऑफिस लगतच्या एका खुल्या प्लॉट मध्ये योग्य ती काळजी न घेतल्याने मागील वर्षापासून ठेवण्यात आलेल्या कुजलेल्या टायरचा मोठा साठा, अनावश्यक झाडें झुडुपे वाढली आहे व पावसाचे पाणी टायरच्या डबक्यात साचल्याने डासांची संख्या वाढून व्यावसायिकांचे, ग्राहकांचे व परिसरातील नागरिकांचे आरोग्य भयंकर धोक्यात आले विशेष म्हणजे व्यावसायिक लाईन मध्ये अनेक व्यावसायिकांना व काम करणाऱ्या गरीब मजुरांना त्या डासांचा माध्यमातुन तापाने ग्रासले आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांनी निवेदनातून व मौखिक उपाययोजना करण्याचा तक्रारी दिल्या माञ चिखलगाव ग्रामपंचायतचा सुस्त भूमिकेमुळे व्यावसायिक हतबल होऊन मालकावर ग्रा.पं.चिखलगाव मेहरबान आहे काय? असा प्रश्र्न देखील करीत आहे. यापुढे ग्राम प्रशासनाचे सचिव,सरपंच काय कारवाई करते याकडे लक्ष नागरिकांचे लागले आहे.
•तर… त्याबाबत कारवाई करण्यात येइल……
“नक्कीच त्या खुल्या प्लॉटवर तश्या प्रकारे दुर्गंधी नकोच.आम्हालाही त्या खुल्या प्लॉट संदर्भात काहीं तक्रारी प्राप्त झालेली आहे त्यावरून ग्रा.पं चिखलगाव कार्यालयातून मेघा इंडेन गॅसचा ऑफिस लगतच्या प्लॉटधारक (मालकाला) दोन नोटीस पाठविण्यात आले आहे. आता पुढील आणखी त्यांना समज देण्यात येईल जर त्यानंतरही ते ऐकत नसतील तर चिखलगाव ग्रामपंचायतच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुण्यनगरी प्रतिनिधी” शी फोनद्वारे सांगण्यात आले. – के.आर.खैरे ( सचिव ग्रा. पं, चिखलगाव )