Vidharbh News Wani Desk:- भाजप हा सेवा कार्याशी निगडीत पक्ष आहे. जनसेवेचे व्रत घेऊन आमची वाटचाल सुरु असते. वणी परिसरात मोठ्या प्रमाणात कोळसा व इतर फॅक्टरी आहेत. त्यामुळे इथे प्रदूषणाची समस्या आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. एक आमदार म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे माझी जबाबदारी आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी हे शिबिर घेण्यात आले. यापुढेही असे सेवाभावी उपक्रम सुरुच राहणार, असे प्रतिपादन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले.It is my responsibility to take care of the health of the citizens of Wani Vidhan Sabha- MLA Bodkuwar.
दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा निमित्त भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा व विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने वणी येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल नांदेपेरा रोड वणी मध्ये दिनांक 22 सप्टेंबर रविवारला निःशुल्क भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन केले. उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर दिनकर पवाडे, विजय पिदूरकर, रवि बेलुरकर, संजय पिंपळशेंडे, श्रीकांत पोटदुखे, गजानन विधाते, संध्या अवताडे, मंगला पावडे, ललिता बोदकुरवार, लिशा विधाते, उमा पिदूरकर उपस्थित होते.
येथील लॉयन्स इंग्लीश मीडियम स्कूल येथे दिनांक 22 सप्टेंबर रोजी सर्वरोगनिदान आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात वणी तालुक्यातील सुमारे 3500 रुग्णांनी तपासणी करण्यात आली. या रुग्णांसाठी व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींसाठी आयोजकांतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील चमूने रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.
शिबिरात रक्तदाब, किडनीचे आजार, हृदयरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसनरोग, नाक कान घसा इत्यादीं रुग्णांची तपासणी करण्यात आली. सर्व रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. अभिषेक इंगोले व रुग्ण संपर्क अधिकारी एल पी शिंगणे यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर पार पडले. सावंगी येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने सर्व रुग्णांची तपासणी व उपचार केलेत. शिबिरात सुमारे 565 रुग्णांना डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. या रुग्णांना दिनांक 24 सप्टेंबर पासून रोज 50 रुग्णांना सावंगी येथे शस्त्रक्रिया व पुढील उपचारासाठी नेण्यात येणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे यांनी केले. सूत्रसंचालन नितीन वासेकर यांनी केले. आभार जयमाला दर्वे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर थेरे, डॉ. धर्मेंद्र सुलभेवार, डॉ. प्रेमानंद आवारी, केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनवणी, आशा वर्कर, गट प्रवर्तिका, ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांची चमू तसेच भाजपचे वणी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.