Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsमोहदा येथील वनहक्क पट्टेधारक शेतकरी अद्यापही योजनांपासून वंचित.....!

मोहदा येथील वनहक्क पट्टेधारक शेतकरी अद्यापही योजनांपासून वंचित…..!

•शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलें निवेदन.

अजय कंडेवार ,Wani:- वनहक्क कायद्यानुसार पारंपरिक शेती करणाऱ्या व वननिवासी अतिक्रमणधारकांना मोहदा सरपंच वर्षा राजूरकर व उपसरपंच सचिन रासेकार यांच्या पाठपुराव्यामुळे वनहक्क पट्टे शासनाच्या वतीने २५ शेतकऱ्यांना बहाल करण्यात आले परंतु शासनाच्या विविध योजनेचा लाभापासून अद्यापही वनहक्क पट्टेधारक शेतकरी वंचित आहे त्याकरिता 7 ऑक्टो लोकशाही दिनी मोहदा येथील उपसरपंच सचिन रासेकर यांनी तक्रार दाखल करीत वनहक्क पट्टेधारक शेतकरी यांच्या माध्यमातुन यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी केली.

वणी तालुक्यातील ग्रा.पं मोहदा सरपंच वर्षा राजूरकर व उपसरपंच सचिन रासेकार यांच्या पाठपुराव्यामुळे २५ शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने वनहक्क पट्टे बहाल करण्यात आले.या शेतजमिनीवर अंशत: या शेतकऱ्यांना अधिकार प्राप्त झाला.परंतु या शेतकऱ्यांना अतिवृष्टी, अवर्षण, कीड व रोगामुळे झालेल्या हानीची नुकसानभरपाई मिळण्यास स्थानिकस्तरावर महसूल कर्मचाऱ्यांकडून अडचणी आणल्या जात आहेत.तसेच शासनाच्या पंतप्रधान पिक विमा योजना, पी.एम. किसान सम्मान निधी योजना, नमो शेतकरी महासम्मान निधी योजना व २०२३ खरीप कापूस सोयाबीन अर्थसाहाय्य अनुदान योजना ह्या शेतकरी या नात्याने अक्षरशः अन्याय होत आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ दिला जाते. मग यवतमाळमधील शेतकऱ्यांना लाभ का नाहीं असा स्पष्ट सवाल उपस्थित झाला आहे. निवेदन देतांना वनप‌ट्टेधारक उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments