अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील शहरासह अनेक ग्रामीण भागात महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे मोठया त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेती सिंचन आणि लोकांना दैनंदिन जीवनात मोठया अडचणी निर्माण होत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य त्रस्त आहेत.नादुरुस्त रोहित्र,अतिरिक्त वीज भार, वीज गळती, फॉल्टी वीजबिले, शेतकऱ्यांसाठी १२ तास वीज याबाबत वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन झोपेचे सोंग घेत कोणतीही उपाययाेजना केली जात नसल्याने वंचित बहुजन आघाडीनें MSEB च्या या ढिसाळ कारभाराविरोधात तालुकाअध्यक्ष हरीश पाते यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसिल चौकात 7 ऑक्टो सोमवार रोजी “एकदिवसीय धरणे”आंदोलनाचा माध्यमातून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देत म.रा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागणीही करण्यात आली.
वणी शहर व ग्रामीण भागातील विज पुरवठा खंडीत झाल्यावर त्याची तक्रार भ्रमणध्वनी व्दारे करण्यासाठी २४ तास भ्रमणध्वनी सुरु ठेवण्यात यावे.विज मिटर नादुरुस्त झाल्यानंतर त्या बदल्यात नविन विज मिटर देण्याची जबाबदारी म.रा.वि.वि.कं. ची असतांना नविन मिटर न देता बाजारातून जादा भावाने विज मिटर खरेदी करण्यास भाग पाडतात. बाजारातून विज मिटर न घेतल्यास ब्लॅकमेल पध्दतीने संबंधित ग्राहकांना रु. ६०,०००/- ते १,००,०००/- पर्यंत विज बिल पाठवुन मनमानी पध्दतीने मानसिक त्रास दिल्या जाते. हा ब्लॅकमेलींगचा प्रकार बंद करण्यात यावा.
शेतकऱ्यांना फक्त रात्रीचे वेळी विज देण्यापेक्षा किमान १२ तास विज (पुर्ण क्षमतेने) सतत देण्यात यावी.गोडगांव येथे जंगली जनावराची दहशत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रात्रीचे वेळी दहशतीत जिव मुठीत घेऊन शेतात जावे लागते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी विजेची व्यवस्था करण्यात यावी यासाठी सतत विज सुरु ठेवावी. वीजेचे दरात भरमसाठ वाढ केली असुन सदर दरवाढ सामान्य नागरीकांचे कंबरडे मोडणारे आहे. त्यामुळे विजेचे दरात वाढ न करता पुर्वीच्या दरा प्रमाणे विज बिल आकारण्यात यावे.तालुक्यात प्रत्येक गावात असलेल्या विज कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक करण्यात यावे.
यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष हरीष पाते,अर्चना कांबळे, वैशाली गायकवाड,नंदिनी ठमके,शारदा मेश्राम, प्रणिता ठमके,अर्चना नगराळे,किशोर मून,प्रदीप मडावी,प्रशांत गाडगे, रज्जत सातपुते,आकाश बोरकर,गजू दामोदर,अब्दुल गणी,गौरव जवादे यांचेसह अनेक पदाधिकारी ,कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.