अजय कंडेवार,वणी:- शहरालगत असलेल्या वागदरा शिवारात नैसर्गिक खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.याच शिवारात पंकज बन्सीलाल भंडारी या व्यक्तीचे शेत जमीन आहे व लगतच शासकीय नैसर्गिक टेकड्या सुद्धा आहेत. सदर या व्यक्तीने शेतात जाण्यासाठी नैसर्गिक टेकड्या जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू केले होते. सदरचे खोदकाम हे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व नियमबाह्य उत्खनन केलें असून याबाबत वापरण्यात आलेली जेसिबी क्र.MH 29 -BV-7088 हे महसूल विभागाने जप्त केली आहे. यावर तहसील प्रशासन काय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य शासन स्तरावर अनेक योजना कार्यान्वित आहेत.शेतमालक नैसर्गिक संपत्तीचा जाणीवपूर्वक ऱ्हास करीत असल्याचे या घटनेवरून निदर्शनास आले आहे. वागदरा गावालगत नैसर्गिक टेकडीवर जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असल्याची माहित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच,घटनास्थळी भेट देत पाहणी केली व खोदकाम केलेल्या नैसर्गिक टेकडीचा पंचनामा करून लगतच असलेल्या सदर शेतमालकाला विचारपूस केली. यात ६ मीटर रुंद व २ मीटर खोल असे खोदकाम केले असल्याचे निष्पन्न झाले.प्रसंगी ७८० चौरस मीटर मुरुमाचे खोदकाम करून सदर मुरुमाची वाहतूक केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. नैसर्गिक टेकडीची जेसीबीच्या साहाय्याने नासधूस केली ती जेसीबी महसूल विभागाने ताब्यात घेण्यात आली माञ वरिष्ठ यावर कारवाई करतात की कानडोळा? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे .या जमीनीतून मुरूमाचे उत्खनन व चोरटी – वाहतूक होत आहे. शासनाची रॉयल्टी चुकवून हे उत्खनन होत असताना महसूल विभागाची यंत्रणा निद्रिस्त कसे त्यांना निद्रवस्थातून उठविण्याचे काम जनतेनें करावे हीच नेहमी महसूल विभागाची असते का असा स्पष्ट आरोपही होऊ लागले आहे.
•वरिष्ठांची दिशाभूल करणारा अपुरा पंचनामा…
•वाचा असा हा या अधिकाऱ्यांनी केलेला भोंगळ…...
“या नैसर्गिक टेकडीतून खोदकाम करून निघालेला मुरूम बाजूचा शेतात नेऊन टाकण्यात आला असा या पंचनामा मध्ये उल्लेख आहे परंतु पंचनामा हा हल्गजिरपणाने बनविण्यात आला हे स्पष्ट आहे. कारण यात शिवार कोणते हे अस्पष्ट? कोणत्या शेतातील गटात ६०० ब्रास मुरुम टाकले. याचा अस्पष्ट उल्लेख आहे . कारण बाजुचा शेतात असा उल्लेख पण साहेब बाजूच शेत कोणाचे , कुठल्या गटाचे ? अनेक प्रश्न अनुत्तरितच.हा थातूर मातुर पंचनामा तयार करून वरिष्ठांची दिशाभूल केल्याचे दिसून येत आहे.असा भोंगळ “त्या ” मंडळ अधिकारी व त्या उपस्थित असणाऱ्या अनुभवी तलाठ्यांच्या उपस्थित हा पंचनामा संशयास्पद असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण जागेवर पाहणी केली असता तिथे काही प्रमाणातच मुरुम दिसले ६०० ब्रास मुरुम गेले कूठे हो साहेब..? मग हा कसला स्पॉट पंचनामा साहेब. यावरून काहीं संबधिताशी साटेलोटे असल्याच जनमानसातून बोलल्या जात आहे.
•त्या विनापरवानगी खोदकामामुळे नैसर्गिक टेकडीवर असणाऱ्या पुरातन मंदिराला धोका….
“शासकीय जागेचे उत्खनन करून पुरातन मंदिराकडे जाण्याचा मार्ग देखील बंद पडला आहे. आणखी थोड्या प्रमाणात हे उत्खनन झाले असते तर हा मंदिर कोसळण्याचा देखील धोका निर्माण झाला असता .वागदरा परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असताना स्थानिक महसूल प्रशासन डोळे झाक का करीत होते असाही एक प्रश्न निर्माण झाला आहे.