अजय कंडेवार,Wani:- तलाठी संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा प्रशासनाकडे अनेक निवेदने, विनंती केल्यानंतरही दाद मिळत नाही. त्यामुळे वणी तालुक्यातील समस्त तलाठ्यांनी बुधवार ११ सप्टेंबरला आंदोलनाचे अस्त्र उगारत तहसिलदार यांचा मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी तलाठ्यांनी डिएससी शासन दप्तरी जमा करण्यात आले आहे.otherwise.September 24 “Mass Leave Movement
यवतमाळ जिल्ह्यातील तलाठी संवर्गाची मागील पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेली सेवा ज्येष्ठता यादी, कालबाह्य झालेले लॅपटॉप व प्रिंटर च्या ऐवजी नविन लॅपटॉप व प्रिंटर देण्यात यावे, यावर्षी झालेल्या सार्वत्रिक प्रशासकीय बदली मधील अनियमितता दुर करण्यात यावी, तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली विनंती बदली, मराठा आरक्षणच्या कामाचे मानधन देण्यात यावे, अनुदान वाटप मेहणताना देण्यात यावा यासह अन्य प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात आला नाही. त्यामूळे वणी तालुक्यातील तलाठ्यांनी डिएससी टोकन वणी तहसील कार्यालयात जमा केले आहे.जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने तलाठी संवर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यानंतरही प्रशासनाने योग्य तो तोडगा न काढल्यास २४ सप्टेंबर पासून “सामुहिक रजा आंदोलन “करण्यात येणार आहे.याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असा स्पष्ट इशारा देण्यात आला .
यावेळी निवेदन देताना विदर्भ पटवारी संघटना नागपूर शाखा वणी चे अध्यक्ष नितेश पाचभाई,उपाध्यक्ष मुकेश इंगोले,सचिव सत्यानंद मुंडे,सहसचिव विशाल मोहितकार,कोषाध्यक्ष विक्रम घुशिंगे तलाठी सुनील उराडे,आकाश डोहे,सचिन नेहारे,किशोर इरुटकर,राहुल माहुरे,कुणाल आडे,रवींद्र उपरे,नितीन कत्रे उपस्थित होते.