अजय कंडेवार,Wani:- लोकसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस उदयास आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येणार, या भविष्यातील स्थितीला ओळखून पक्षश्रेष्ठींनी विधानसभेची रंगीततालीम सुरू केली आहे. दरम्यान,शनिवारीता .14 सप्टें ला काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक तथा मध्यप्रदेशचे माजी आमदार कुणाल चौधरी(राहूल ब्रिगेड) यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सातही विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती यवतमाळ येथील बलवंत मंगल कार्यालयात पार पडले.
या आढावा बैठकीला जिल्ह्यातील अनेकांची उपस्थित होती . यात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहे. महाविकास आघाडी व सत्ताधारी महायुतीमध्ये जोरदार टस्सल होण्याची चिन्हे आहे. दरम्यान, आघाडीत लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारी काँग्रेस सध्या फुलफॉर्ममध्ये आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरद पवार गट व काँग्रेस असे असले तरी काँग्रेस सध्या फुल्ल फॉर्म मध्ये दिसत आहे. जनतेचा मनात काय होत ते जनतेनी लोकसभा निवडणूकीत दाखविलेच आहे. सध्यातरी काँग्रेसमय वातावरण वणी विधानसभेत दिसत असल्याचे चिन्ह आहे. याची माहिती ही निरीक्षकांनी नोट केलेली आहे.
या वातावरणात कोंग्रेसचे एकूण 16 उमेदवारांनी काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक तथा मध्यप्रदेशचे माजी आमदार कुणाल चौधरी यांना उमेदवारीसाठी इच्छुक आहोत्त असे स्पष्ट सांगीतले होते .नंतर मुलाखतीत वणीतील 9 उमेदवारानी संजय खाडे यांना समर्थन दिले आहे .
त्यात तीकिटासाठी जबरदस्त काट्याची टक्कर संजय खाडे, वामनराव कासावार, प्रा. टिकाराम कोंगरे, डॉ. महेंद्र लोढा, अरुणाताई खंडाळकर, कुल्संगे यात दिसणार आहे. परंतु यातही जनतेचा संपर्कात असणारे संजय खाडे यांचे पारडे जड आहे कारण त्यांचे कामे मागील दिड वर्षापासून जनतेनी अनुभवले आहे व नंतर वैद्यकीय क्षेत्रात सुप्रसिद्ध असणारे डॉ. महेंद्र लोढा हे देखील अग्रेसर आहे.म्हणुन हेच काँग्रेसचे विकासाचे दोन नविन चेहरे म्हणुन जोरदार चर्चा जनेतेतून देखील सूरू आहे.