Tuesday, April 21, 2026
HomeUncategorizedवणी तहसीलमध्ये शुकशुकाट...

वणी तहसीलमध्ये शुकशुकाट…

Ajay Kandewar,Wani : राज्यभरातील सुमारे १७ लाख सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर गेल्याने वणी तहसीलमध्ये ही शुकशुकाट बघायला मिळाला आहे. प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला असून, समन्वय समितीच्या आवाहनाला वणी कर्मचाऱ्यांकडून ही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध शासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत प्रगती योजना (१०-२०-३०) लाभ, निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, रिक्त पदे भरणे यांसारख्या प्रमुख मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. राज्यात सुमारे ३५ टक्के पदे रिक्त असल्याने कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. तसेच चतुर्थश्रेणी व वाहनचालक भरतीवरील बंदी उठवून व्यापक कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करण्याची मागणीही यावेळी वणीतील कर्मचाऱ्यांचाही संपात सहभाग दिसला.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page