Tuesday, July 28, 2026
HomeBreakingटाळ-मृदुंगाच्या निनादात दुमदुमली देशमुखवाडी.....

टाळ-मृदुंगाच्या निनादात दुमदुमली देशमुखवाडी…..

Ajay,वणी : आषाढी एकादशीचे औचित्य आणि ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमाच्या निमित्ताने देशमुखवाडी येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये श्री विठ्ठल पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या शेकडो वर्षांच्या वारकरी परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याच्या उद्देशाने कवायती, वारकरी फुगडी, प्रती पंढरपूर वारीचा देखावा आणि पालखी सोहळ्याचे आकर्षक आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायातील संस्कार, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश प्रभावीपणे सादर केला.

देशमुखवाडीच्या मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या वारकरी दिंडीत ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या विद्यार्थ्यांनी टाळांच्या गजरात अभंग गात दिंडीला उत्साहाचे स्वरूप दिले. अनेक विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल, रुख्मिणी माता, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज तसेच वारकरी यांचे वेश परिधान करून पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. त्यामुळे प्रत्यक्ष पंढरपूर वारीचा अनुभव उपस्थितांना अनुभवता आला.

सोहळ्यादरम्यान शाळेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी श्री विठ्ठल, रुख्मिणी माता व पालखीचे पूजन करून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक मूल्यांची सांगड घालणारा हा पालखी सोहळा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page