Tuesday, May 5, 2026
HomeBreaking Newsअरेच्या....वणीत दुर्मिळ ‘मॉटल्ड वुड Owl’ ला जीवनदान....

अरेच्या….वणीत दुर्मिळ ‘मॉटल्ड वुड Owl’ ला जीवनदान….

Ajay Kandewar,Wani:- शहरात दुर्मिळ ‘मॉटल्ड वुड आऊल’ (घुबड) प्रजातीच्या पक्ष्याचे जीव वाचवून युवकांनी पर्यावरण संवर्धनाची जाणीव पुन्हा अधोरेखित केली आहे. पक्षी निरीक्षक शुभम मदान आणि त्यांचे सहकारी हार्दिक गुंडे यांनी अत्यंत धाडस आणि तत्परता दाखवत ही यशस्वी रेस्क्यू मोहीम पार पाडली.

माहितीनुसार, ड्रीम लँड सिटी परिसरात एक दुर्मिळ घुबड गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले होते. माहिती मिळताच शुभम मदान आणि हार्दिक गुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या जलद निर्णयक्षमतेमुळे आणि तत्पर कृतीमुळे या पक्ष्याला वेळेत मदत मिळू शकली.घटनास्थळी उपस्थित भास्कर कुमरे, भरत मालेकर आणि दिवाकर बनकर यांनी सांगितले की, अलीकडील वादळामुळे घुबडाला गंभीर दुखापत झाली असावी कारण अंगावर अनेक जखमा असल्याने त्याची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली. अशा कठीण परिस्थितीतही शुभम मदान आणि हार्दिक गुंडे यांनी शांतता राखत रेस्क्यू प्रक्रिया प्रभावीपणे पूर्ण केली.सर्पमित्र हरीश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी घुबडाला तातडीने शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. अखिल गुंजेवार आणि त्यांच्या टीमने तत्काळ उपचार करून पक्ष्याचे प्राण वाचवले.उपचारानंतर घुबड वनरक्षक सुनील वाघ यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील प्रक्रिया वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO), वणी यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

या मोहिमेत ताडोबा येथील RFO  रुंदन काटकर, सुमेध वाघमारे, डॉ. अखिल गुंजेवार आणि आनंद कानडे यांचे मार्गदर्शन लाभले असले, तरी संपूर्ण कारवाईत शुभम मदान आणि हार्दिक गुंडे यांनी घेतलेली पुढाकार, धाडस आणि वेगवान निर्णय हेच या रेस्क्यूचे खरे वैशिष्ट्य ठरले.दुर्मिळ पक्ष्याचे प्राण वाचवण्यात यश मिळाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत असून शुभम मदान आणि हार्दिक गुंडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page