अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील राजूर प्राथमिक आरोग्य केंद्र हे मोठें केंद्र मानले जाते. मात्र, आता आरोग्य केंद्राची समस्याग्रस्त केंद्र म्हणून नव्याने ओळख निर्माण होत आहे. कर्मचा-यांची रिक्त पदे, शोभेचे निवासस्थाने , मुख्यालयीन राहत नसल्याने यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर असल्याची शोकांतिका निर्माण झाली आहे. अपु-या आरोग्य सुविधांमुळे रुग्णांवरही उपचार होत नाहीत. परिणामी सध्या सुरू झालेल्या पावसाळय़ामध्ये उद्भवणा-या साथरोगांवर नियंत्रण आणण्यासाठी काहीं मर्यादा आहे त्यातही आरोग्य यंत्रणा सपेशल फुस्स होत अशी स्थिती निर्माण झाली आहे.
गोर गरीब आणि अडाणी लोकांचा वैद्यकीय क्षेत्र आणि डॉक्टरांवर भाबडा विश्वास असल्याने अनेकदा आरोग्य यंत्रणे कडून मिळणाऱ्या या अधिकाऱ्यांचा हीन वागणुकीवर सर्वसामान्य नागरिक बोलत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे फावले असून याबाबत आरोग्य प्रशासन उदासीन असल्याने न मिळणाऱ्या सेवा कधी मिळणारकधी हे अधिकारी पूर्णवेळ या आरोग्य केंद्रात राहणार यांकडे जनतेचे आवर्जून लक्ष आहे. राजूर गावात विशेषतः हे दोन वैद्यकिय अधिकारी मागील काही वर्षांपासून पुर्णवेळ राहत नसल्याची ओरड आहे. एक अधिकारि घेतो सोमवार ते बुधवार दिवस तर दुसरा अधिकारी घेतोय गुरुवार ते शनिवार दिवस… वरिष्ठांचा पाठीमागे “अळीमिळी ” गुपचिळी चालत असतानाही ग्रामपंचायत व रुग्णकल्याण समितीही याबाबत गप्प का? हे न समजणारे कोडच आहे.
पण गावातील रुग्णांचे बेहाल होतांना स्पष्ट दिसत आहे.दोन्ही वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी हजर राहत नसल्याने याचा परीणाम रुग्णसेवेवर होत आहे यात तिळमात्र शंका नाहीच तरीही M.Oम्हणे मी मुख्यालयी राहतोच म्हणतो.. याचा अर्थ “उलटा चोर कोतवाल को डांटे “अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु याकदे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने त्या दोन वैद्यकिय अधिकारि यांना पाठबळ मिळत असल्याचं दिसते आहे. त्यामुळे गावकरी आता यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना भेट देत चर्चा करण्याचें ठरविले आहे. यात सर्व संबधित अधिकारी यांना धारेवर धरले जाईल यातही सांशकता उरली नाही. आता पुढील कारवाई कधी व केव्हा होईल याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे.