अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील जि.प.शाळा पठारपूर येथे 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जीवन पिंपळकर व प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचा नीता टेमुर्डे, पोलीस पाटील अमोल मांडवकर, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यगण, ग्रामपंचायत सदस्यगण व गावातील प्रतिष्ठित नागरिक,ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर सुद्धा उपस्थित होते.याप्रसंगी शाळेला 2 फोटो समिती सदस्यांनी भेट दिली व ग्रामपंचायत कडून शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटप करण्यात आले.In Z. P. School Patharpur Independence Day in
बँड पथकाद्वारे गावात रॅली काढण्यात आली. जननायक बिरसा मुंडा यांच्या तैल चित्रावर पूजन करून हारार्पण करण्यात आले .लहान मुलांनी जोरदार नारे दिले, मुलांनी छान छान भाषणे, समूह देशभक्तीपर गीते, वैयक्तिक गीते, सुंदर डान्स असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले,.नवनियुक्त पोलीस खात्यात नोकरी मिळालेल्या पल्लवी काळे हिचा सत्कार ग्रामपंचायत तर्फे शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.
तसेच गावातील आजी सैनिकाच्या परिवारातील इंदिरा लेडांगे यांचे स्वागत करण्यात आले आणि शाळेतील लिडर माता पालकांचे सुद्धा कौतुक केले.या कार्यक्रमात तंबाखूमुक्त व निपुण भारत शपथ घेण्यात आली. शाळेत नव्याने रुजू झालेल्या सुरेश बदखल व प्रकाश तालावार यांचे स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना तेलगोटे, प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बदखल व आभार प्रदर्शन प्रकाश तालावार यांनी केले. शेवटी मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली.