Friday, May 8, 2026
HomeBreakingराजूर PHC मध्ये " मुजोर डॉक्टर" गायब......

राजूर PHC मध्ये ” मुजोर डॉक्टर” गायब……

Ajay kandewar,Wani:- तालुक्यातील राजूर येथील प्राथमिक आरोग्य “केंद्रातील भोंगळ आणि मनमानी” कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र विरोध होत आहे. विविधतेने नटलेल्या तसेच चुनाभट्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातील PHC आता अक्षरशः “शोभेची वस्तू” बनली आहे. ता.8 में रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून दहा ते वीस रुग्ण उपचारासाठी आरोग्य केंद्रात उपस्थित होते, मात्र साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत एकही डॉक्टर हजर नसल्याने रुग्णांची मोठी हेळसांड झाली. आजारी नागरिक, “महिला व वृद्धांना” तासन्तास प्रतीक्षा करावी लागल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

विशेष म्हणजे, गावातील काही युवकांनी प्रत्यक्ष PHC मध्ये जाऊन पाहणी केली असता तेथे एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे, तेथील कंपाउंडरच रुग्णांची चिठ्ठी लिहून औषधे देत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून याचा व्हिडिओही समोर आल्याची माहिती आहे. अनुपस्थित डॉक्टरांना कर्मचाऱ्यांनी वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित डॉक्टर फोन रिसिव्ह करण्यासही तयार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे “सरकारी आरोग्य सेवा नेमकी कोणाच्या भरोशावर सुरू आहे?” असा संतप्त सवाल गावकरी उपस्थित करत आहेत.

दरम्यान, येथील वैद्यकीय अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी व निवेदने वरिष्ठांकडे गेल्याची चर्चा असून तरीही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. तालुका आरोग्य प्रशासन झोपेत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात असून संबंधित “मुजोर वैद्यकीय अधिकाऱ्यांची” तात्काळ चौकशी करून बदली अथवा कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकाराची दखल घेणार की पुन्हा एकदा प्रकरण दाबले जाणार, याकडे संपूर्ण राजूर परिसराचे लक्ष लागले आहे.

विदर्भ न्यूज पोर्टल घेणार या प्रकरणाची दखल….. या मुजोर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना  रडारवर घेणार आणि नागरिकांना न्याय मिळवून देणार…..

क्रमशः…..वाचा पुढील भाग….

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page