अजय कंडेवार,Wani :- तालुक्यातील वणी पंचायत समितीचा मुख्यालयापासून ५ किमी अंतरावर असलेल्या भालर ग्रामपंचायतीत सरपंच व सदस्यांना २ आॅक्टोबर बुधवार रोजी “महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री” जयंतीचा विसर पडला असून केवळ १ सदस्य,उपसरपंच व आशा ताईंचा मदतीनें महात्म्यांच्या फोटोंना हारअर्पण केलें. भालर ग्रामपंचायतेत एकूण ९ सदस्य संख्या व जवळपास १८०० च्या वर लोकसंख्या असलेल्या भालर गावात निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीबाबत एक धक्कादायक बाब समोर आली.विशेष म्हणजे भालर “सरपंच” यांनी सचिवाला देखिल या कार्यक्रम अनुपस्थितीबद्दल लेखी किंवा तोंडी देखील कळविले नाही . यावरून स्पष्ट ग्रामपंचायतीचा भोंगळपणा दिसून येतो.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधी यांनी आपले आयुष्य घालविले. ते सदैव स्मरणात राहावे तसेच त्यांचे विचार व कृती प्रत्यक्षात उतरावी यासाठी दरवर्षी २ आॅक्टोबर रोजी प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, शाळा, नगर पंचायत कार्यालयामध्ये गांधी जयंती साजरी करत असतात.या गांधी जयंतीचे औचित्य साधून विशेष सभा घेणे, स्वच्छता अभियान राबविणे आवश्यक असते. मात्र वणी तालुक्यांतील ग्रामपंचायत भालरच्या गावातील सरपंच व सदस्यांना अक्षरशः गांधी जयंतीलाच विसर पडला. काही ग्रामस्थांनी दिलेल्या माहिती नुसार गावातील सरपंच ह्या कार्यक्रम प्रसंगी गावातच उपस्थित होत्या पण ग्रामपंचायत कार्यालयात आल्या नाही त्यानंतर प्रतिनिधींनी माहिती घेतली असता, अशी कोणतीही पूर्वसूचना तोंडी किंवा लेखी स्वरूपात त्या सरपंच व सदस्यांनी दिलीच नाही अशी धक्कादायक बाब समोर आली.भालर ग्रामपंचायतच्या सरपंच व पदाधिकाऱ्यांनी गांधी जयंती कार्यक्रमासाठी थोडाही वेळ दिला नाही. ही शोकांतिकाच व हलगर्जीपणा दिसून आला.
“मलाई” कडे सर्वांचे लक्ष मात्र “अभियान”शून्य…....
“गावात एखादी व्यवसाय आले की,NOC कोणाला द्यायची आणि कोणाला नाहीं द्यायची याबाबत सरपंच,उपसरपंच, सदस्य व सचिव एकत्र येतात .माञ महात्म्याना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती बाबत पिछेहाट दिसते ही तर शोकांतिकाच आहे. विशेष म्हणजे “एक तो..” नेमूण ग्रामपंचायत चक्रे कसे चालवायचे हेचं काहींना कळते परंतु महात्म्याच्या जयंतीला, गाव अभियानाला व उपक्रमाला आता या जनेतेचा प्रतिनिधींनी पाठ दाखविल्याचे चित्रं सद्या भालर गावात दिसून आली.”तसेच या ग्रामपंचायतीत सरपंच “नाममात्र” आणि कारभारी “सूत्र “ दुसरीकडे असल्याचेही गावात ओरड जोऱ्यात सूरू आहे. गावात चाललेल्या कारभाराबाबत तरुण मंडळी व गावकरी याकडे मोठया बारकाईने लक्ष देऊन आहे. परंतु काही कारभार करणाऱ्यांना वाटतें की, ” बिल्ली जब दूध पिती हैं तब आखें बंद करके पीती हैं… देखने वाले कोई नहीं पर ये “बिल्ली” नहीं जानती की कितने लोग देख रहे हैं..”अशी स्थिती या ग्रामपंचायतीत उठ – सूठ मूळे निर्माण झाली आहे.