अजय कंडेवार,वणी :- शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला असता तो पळत सुटत त्या काटेरी कंपाऊंडने जखमी झाल्याची घटना चिखली परमडोह शेत शिवारात अचानक दि.29 डिसे 2024 ला सायंकाळीं 4 ते 5 वाजताचा दरम्यान घडली.
चिखली येथील अमोल सोनटक्के, (वय 25 वर्ष) हा चिखली या शेत शिवारातील शेतात काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे हल्ला चढविला असता तो पळत सुटला त्यात तो युवा शेतकरी अत्यंत गंभीर जखमी झाला.या इसमावर वाघाने हल्ला चढविला असता, त्यानें लगेच जोऱ्यात शेताचा कंपाऊंडकडे धाव घेत उडी घेतली असता लोखंडी कंपाऊंडचे धारदार काटे त्याचा अंगावर लागल्याने तो अतिशय गंभीररित्या जखमी झाला.त्यावर सध्या इस्पितळात उपचार सूरू आहे.अपघातस्थळी वनविभागाची टीम पोहोचली असून तिथे पंचनामा देखिल झाल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.सध्या गावात दशहतीचे वातावरण पसरले आहे.
•चिखली, परमडोह परिसरात वाघाची दहशत…..
“परिसरात वाघाची दहशत पसरलेली आहे.आता हंगाम सुरू आहे. सध्या या भागात मागील काहीं महीण्यांपासून 1 वाघीण व दोन बछडे दिसल्याची चर्चा होतीच.आता हीच वाघीण शेतकऱ्याना घातक देखिल ठरू लागली आहे.”या वाघिणीचा बंदोबस्त वनविभागानी करावा अशी मागणी शेतकरी करू लागले.