अजय कंडेवार, वणी:- पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या बोअरवेलची मोटार बिघडल्याने कायर गावात गेल्या चार दिवसांपासून पाण्याचे संकट गडद झाले आहे.विशेषत: दलित वसाहतीत व वॉर्ड क्र.3 (अर्धा भाग) या समस्येमुळे ग्रामस्थांनी तोंडी तक्रारही केली आहे. पण काम सुरूच आहे हाच मात्र उपाय दिसत आहे.
वणी तालुक्यात कायर हे मोठे गाव आहे. पाणीपुरवठ्यासाठी गावातच कुंपनलिका बसवण्यात आल्या आहेत. चार दिवसांपूर्वी मोटार खराब झाली. ज्या कुंपनलिकेची मोटार खराब झाली आहे. ती मोटार अर्ध्याहून अधिक गावाला पाणीपुरवठा करते. ग्रामपंचायत प्रशासन मोटार दुरुस्त करण्यासाठी कार्यवाही अत्यंत संथगतीने करत आहे. मोटार खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होत असल्याचे ग्रामपंचायत सचिवाचे व सरपंच यांचे म्हणणे आहे. गावकरी इकडून तिकडे पाणी आणून हाल अपेष्टा सहन करत आहेत. एवढ्या मोठ्या गावात चार दिवसांपासून पाणीप्रश्न होऊनही ग्रामपंचायत प्रशासन याप्रकरणी गांभीर्य दाखवत नाही.
गाव प्रमुख व अधिकारी पूर्णपणे बेफिकीर असल्याचे ग्रामस्थांचे आरोप आहे तसेच स्थानिक प्रशासकांना जनतेच्या प्रश्नांची अजिबात काळजी नाही. वारंवार तक्रारी करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. इतर भागात फक्त पाणी आणि दलित भागात व वॉर्ड क्र.3 (अर्ध्या भागात) असे अत्याचार का होतात? अशा कडक उन्हात पाण्याअभावी सर्वांचेच हाल होत आहेत.
कोड….
“कायर सरपंच यांचा म्हणण्यानुसार, गावात मागील 4 दिवसापासून कार्य सुरुच आहे. मी आणि प्रशासन गावकऱ्यांसाठी दिवस रात्र एक करत आहे. मला माझं गाव आणि गावातील जनता प्रिय आहे. त्याच्यासाठी नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे.
– घणकसार ,(सरपंच ,ग्रा.पं कायर)