Thursday, December 4, 2025
Homeवणीउत्पन्न व डोमीसियलचे दाखले अधिकृत सेतूमधूनच द्या- खुशाल बासमवार

उत्पन्न व डोमीसियलचे दाखले अधिकृत सेतूमधूनच द्या- खुशाल बासमवार

•महिलांची दाखल्यांसाठी होणारी पायपीट थांबावी. •जिल्हाध्यक्ष विजय नगराळे यांचा नेतृत्वात निवेदन दिले.

अजय कंडेवार,वणी :- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांचे आरोग्य, पोषण व स्वावलंबनासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ सर्व पात्र महिला भगिनींना मिळावा, त्यांचे श्रम सदर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जुळविण्यात वेळ वाया जाऊ नयेत, म्हणून जिल्हा प्रशासाने तहसील कार्यालयातील अधिकृत सेतू केंद्रातूनच डोमीसियल व उत्पन्नाचे दाखले “शासकीय दरातच “उपलब्ध करून द्यायला हवेत आणि खाजगी सेतूतून जादा रक्कम उकळण्याचा प्रकार थांबवावा याकरिता वणी शहरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे यवतमाळ सामजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय नगराळे यांचा नेतृत्वात रा.श.प गटाचे वणी तालुका कार्याध्यक्ष खुशाल बासमवार यांनी उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना 3 जुलै रोजी साकडे घातले.

राज्यातील २१ ते ६० वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता आणि निराधार महिलांना ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दरमहा एक हजार ५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. हे दाखले मिळविण्यासाठी वणी तालुकाक्यात तहसील कार्यालया (वणी शहरात व ग्रामीण भागात) तसेच काही प्रमाणात शेजारी असलेल्या खासगी सेतू केंद्रावरही महिलांची गर्दी होताना दिसत आहे. तसेच त्यांच्याकडून जादा रक्कम उकळली जात असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.त्यामुळे सदर दाखले हे शासकीय दरात आणि तहसील कार्यालयातील अधिकृत सेतू केंद्रातूनच देण्यात यावे ,अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वणी तालुका कार्याध्यक्ष खुशाल बासमवार यांचे जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे 3 जुलै रोजी करण्यात आले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments