अजय कंडेवार,वणी: चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेसचे वणी विधानसभा क्षेत्राचे नेते संजय खाडे यांनी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, बेरोजगार, गोरगरीब, दिव्यांग, युवावर्ग व महिला पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रखरतेने आवाज उठविण्याचा निर्धार केला आहे. या सर्वांच्या न्याय व हक्कांसाठी चालतं फिरतं जनहित केंद्र सुरु करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून सर्व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्वसामान्य जनतेचं जगणं सुलभ व्हावं हा प्रामाणिक हेतू ठेऊन संजय खाडे यांनी या मोहिमेला हात घातला आहे. ४ जुलैला सकाळी ११ वाजता खाती चौक येथे या मोहिमेचा सर्व जनतेच्या साक्षीने शुभारंभ होणार आहे. तेंव्हा “चालतं फिरतं जनहित केंद्र” या मोहिमेच्या उदघाटन सोहळ्याला तालुक्यातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून अन्यायकारक धोरणांवर आवाज उठविण्याच्या या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन काँग्रेस नेते संजय खाडे यांनी केलं आहे.