अजय कंडेवार-Wani:- छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र” या नावाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली होती. परंतु तेही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अद्यापही पूर्णपणे मिळाली नाही तसेच पीक कर्जासाठी नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान दिले जात होते. याचा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला होता परंतु तेही आता रखळल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावें व मागील दोन तीन वर्षापासू बोगस बियांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. मागील दोन तीन वर्षापासून बोगस बियांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. पेरणीनंतर बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते शासनाच्या व बीज कंपनीच्या या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा भुर्दडं सोसावा लागला. म्हणून अश्या शेतकऱ्यांनाही कर्जातून मुक्त करण्यात यावे,याकरिता जिल्हा मध्यवर्ती बँक चें माजी अध्यक्ष प्रा.टिकराम कोंगरे यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्याकरीता “स्वाक्षरी मोहिम” हा स्त्युत्यमय उपक्रमाची सुरूवात चंद्रपूर- वणी – आर्णी लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खा.प्रतिभाताई धानोरकर यांच्या विशेष स्वाक्षरी नें 22 जून रोजी करण्यात आली. “Signature campaign” started from the concept of Prof.Tikaram Kongre.
शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच असून शेतकऱ्यांना त्या आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नसतात त्यामुळे शेती करण्यासाठी ते स्वतःच्या मालकीची शेतजमीन किंवा रहाते घर सावकाराकडे किंवा बँकेकडे गहाण ठेवून शेतीसाठी किंवा शेतीच्या इतर कामासाठी व्याजाने पैसे घेतात व रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेती करतात. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारे, खते, बियाणे, कीटकनाशक यांच्या किंमती वाढतच असतात त्यामध्ये आणखी भर म्हणून अवकाळी पाऊस, दुष्काळ, वादळ, पूर, गारपीट, मोकाट जनावरांमुळे पिकांचे होणारे नुकसान, कमी बाजार भाव अशा अनेक कारणामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकाचे खूप मोठे नुकसान होत असते. राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्या सोडविण्यासाठी व त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने 2017 मध्ये “छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र” या नावाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली होती. परंतु तेही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अद्यापही पूर्णपणे मिळाली नाही
तसेच दुसरीकडे तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यानंतर राज्यात देखील कर्जमाफी व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. पण पहिल्या दोन कर्जमाफीतील जाचक अटीचा शेतकऱ्यांना सामना करायला लागला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. याआधी 2017-18 साली युतीच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 36,000 हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला होता. यानंतर महाविकास आघाडी सरकारने 2021 साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पीक कर्जासाठी नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान दिले जात होते. याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला होता परंतु तेही आता रखळल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान यावें.
तसेच मागील दोन तीन वर्षापासून बोगस बियांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. पेरणीनंतर बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते शासनाच्या व बीज कंपनीच्या या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा भुर्दडं सोसावा लागला. म्हणून अश्या शेतकऱ्यांनाही कर्जातून मुक्त करण्यात यावे, अश्या मागणीकरीता वणी विधानसभा क्षेत्रात स्तुत्यमय “स्वाक्षरी मोहीम” हा उपक्रम राबवून जिल्हा मध्यवर्ती बँक चें माजी अध्यक्ष प्रा.टिकराम कोंगरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे याकरीता महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे .