अजय कंडेवार,वणी:- श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचा कार्यक्षेत्रात अव्वल आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पतसंस्थे तर्फे करण्यात आला.Shri Ranganath Swamy Civil Co-operative Credit Institution felicitated meritorious.
शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या 10 वी 12 चा परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केलें.याचीच दखल घेत रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेने एक स्तुत्यमय उपक्रम राबवित त्यांचा कार्यक्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन आई वडीलांसहित क्षितिज राऊत, रोमहर्ष मेश्राम, नामोष कामथे, सुमित वसाके, रुपाली केळझरकर, यशश्री जैस्वाल, मानसी लिपटे, आर्या पावडे,संस्कार विनोद बाळेकरमरकर या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार केला.
“यावेळी बोलताना संस्थेचे सीईओ संजय दोरखंडे म्हणाले, जीवन समृद्ध करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना वाचनावर विशेष भर देत, वाचन हे जीवनाचा एक अविभाज्य घटक बनविले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीदेखील जपल्या पाहिजेत, आवडणाऱ्या गोष्टी आपण अधिक चांगल्या करू शकतो, असेही ते म्हणाले.”
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे आणि शहरचे व्यवस्थापक अमोल मांडवकर ,वणी ग्रामीण चे व्यवस्थापक प्रवीण नांदे ,मुकुटबन शाखेचे व्यवस्थापक अमोल काळे,वणी चे संचालक परीक्षित एकरे तसेच वरोरा शाखेचे व्यवस्थापक विलास बोबडे, मुख्य कार्यालयाचे शकवी शास्त्रकार, विजय बोरपे सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारीवृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्याना पुष्पगच्छ आणि भेटवस्तू देऊन भव्य सत्कार पार पडला व पुढच्या वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आलें.