Ajay Kandewar,वणी :- न्यायालयात प्रलंबित फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी वणी तालुका विधी सेवा समिती मार्फत शनिवार 14 डिसें.न्यायालय परिसरात रंगनाथ आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये श्री.रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्थेचे एकूण 97 प्रकरणे निकाली काढून 1 कोटी 38 लाख 39 हजार रुपयांची वसुली करण्यात आली.या राष्ट्रीय लोक अदालतला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद ही मिळाला.Shri. Ranganath Swami Cooperative Society settled 97 cases, recovered loans worth Rs. 1 crore 38 lakh.Shri. Ranganath Swamy Cooperative Society settled 97 cases, recovered loans worth Rs. 1 crore 38 lakh.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,यवतमाळ यांचे निर्देशानुसार वणी तालुका विधी सेवा समिती मार्फत शनिवार 14 डिसेंबर 2024 रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, वणी येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.यात सर्वात जास्त प्रकरण निकाली काढता यावे,याकरिता पॅनल गठीत करण्यात आले.ज्यामध्ये न्यायधीश म्हणून एस.डी.भोसले आणि एस.के.शेख यांनी कामकाज बघितले तर सदस्य म्हणुन ॲड.एस एम पठाण उपस्थित होत्या.सदर लोकअदालतमध्ये श्री.रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्था आपसी निपटारा प्रकरणे काढण्यात अव्वल ठरली. कारण संस्थेने मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांच्या नेतृत्वात तब्बल 97 प्रकरणे निकाली काढून 1 कोटी 38 लाख 39 हजार रुपयांची वसुली केली. हा वसुली आकडा लोकअदालतचा आकर्षक ठरला.
श्री.रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्थे अंतर्गत दाखल प्रकरण राष्ट्रीय लोक अदालत मध्ये निकाली काढण्याकरीता अध्यक्ष देविदास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांच्या नेतृत्वात सर्व शाखेचे व्यवस्थापक व कर्मचारीवर्ग हे देखील हजर होते.सदर लोकअदालत व विशेष मोहिम यशस्वी होण्यास समस्त व्यवस्थापक व कर्मचारीवर्ग यांनी अथक परिश्रम घेतले.त्यासह वकील संघटनेचे अध्यक्ष व इतर मान्यवर वकीलांनी मोलाचे सहकार्य केले तसेच लोकअदालत यशस्वी होण्यास सहभाग दिला.