Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील बनावट सातबारा, बोगस फेरफार आणि संगनमताच्या जोरावर लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या वडगाव (धं) येथील बहुचर्चित जमीन घोटाळ्यातील मुख्य “चाकणचोल्या” 420 बनावटखोर सतीश केराम याला अखेर वणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या मात्र दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावत थेट यवतमाळ कारागृहात रवाना केले.

“मुख्य सूत्रधार” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 420 “चाकणचोल्या” सतीश केरामकडून पोलिसांच्या हाती नेमकं काय लागलं…? कारण अटकेनंतर मोठमोठी नावे समोर येतील, महसूल विभागातील आणखी धक्कादायक खुलासे होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण प्रत्यक्षात तपासात अद्याप तरी कोणताही मोठा स्फोट झालेला दिसत नाही. उलट, दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतरही “चाकणचोल्या” सतीश केरामने पोलिसांना सरळ-सोट बयान देत तपासाची दिशा ‘वाकडी’ झाली,’सतीशने शैलेश वाकडे याचा आधीच वणी पोलिसांनाच ‘वाकडे’केले का…?
या प्रकरणात बनावटखोर “चाकणचोल्या” सतीश केरामचा कथित साथीदार शैलेश वाकडे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो सतत गुंगारा देत पोलिसांना अजूनही वाकड करत आहे. “चाकणचोल्या”सतीश केरामने स्वतः काही उघड न करता, संपूर्ण तपासच थंड केला का?”

कारण ज्याच्याकडून मोठे आर्थिक व्यवहार, बनावट कागदपत्रांची साखळी आणि संगनमताचे धागेदोरे बाहेर येण्याची अपेक्षा होती, त्या सतीश केरामचे बयान मात्र अत्यंत “साधे” आणि “किचकटपणाशिवाय” असल्याचे बोलले जात आहे.महसूल विभागातील अधिकाऱ्यांना तात्पुरता दिलासाफिर्यादी सूरज रमेश चाटे यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी सतीश केराम, शैलेश वाकडे, तलाठी रविंद्र उपरे आणि मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांच्याविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि संगनमताने व्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.दरम्यान, या प्रकरणात नाव आलेल्या महसूल विभागातील दोन अधिकाऱ्यांना न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिल्याने या संपूर्ण प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.’जमीन घोटाळ्याचा मास्टरमाईंड की फक्त चेहरा…?’चाकणचोल्या’सतीश केराम हा या प्रकरणातील केवळ चेहरा आहे की खरा मास्टरमाईंड, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कारण अटकेनंतर अपेक्षित असलेली “मोठी मासळी” अद्यापही तपासाच्या जाळ्यात आलेली नाही.

