अजय कंडेवार,Wani :- वणी हा मनसेचा बालेकिल्ला असून हा किल्ला अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने हा दौरा असल्याचे मानले जात आहे. राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात झाली असून २२ ऑगस्ट रोजी हॉटेल जन्नत सेलिब्रेशन येथे जोरदार स्वागत करण्यात आले. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहराच्या प्रमुख चौकात मोठं मोठें होर्डिंग्ज,ठिकठिकाणी झेंडे लावण्यात आले . त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते आणि समर्थक जमले होते.
विशेषतः २३ ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली असून या बैठकीस मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर १२ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य स्वागत होणार आहे.वणी मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि अशातच आता राज ठाकरे यांचा दौरा म्हणजे विधानसभेकरीता हा मतदारसंघ अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने केला जाणारा दौरा असल्याचे मानले जात आहे. उद्याला पदाधिकाऱ्याना काय बोलणार आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.