Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsसावधान...५ अधिकारी अन् ५० कर्मचारी ॲक्शनमोड मध्ये.....

सावधान…५ अधिकारी अन् ५० कर्मचारी ॲक्शनमोड मध्ये…..

•होळीनिमित्त वणी विभागात P.I अनिल बेहरानी यांची करडी नजर.

अजय कंडेवार,Wani:- होळी व धूलीवंदननिमित्ताने शहरात दोन दिवस चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर सण साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याचेही आवाहन वणी ठाण्याचे P.I अनिल बेहरानी यांच्या तर्फे जनतेला करण्यात आले आहे. P.I Anil Behrani’s eagerly look at on the occasion of Holi.

होळीनिमित्ताने शहरात ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू असतानाच पोलिसांनीही सतर्कता बाळगली आहे. होळीच्या सणाला कोणतेही गालबोट लागू नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. त्याकरिता शहरातील महत्त्वाची ठिकाणे व चौकांमध्ये चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. याकरिता ५० कर्मचारी ५ अधिकारी असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.यादरम्यान संशयित वाहनांची झडाझडती घेतली जाणार असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय मोठ्याने घोषणा देणे, वाद्य वाजविणे, असभ्य कृत्य करणे, महिला अथवा मुलींची छेड काढणारे, वाहनांवर अथवा पादचाऱ्यांवर फुगे फेकणारे, यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे वणी ठाणेदार P.I अनिल बेहरानी यांनी सांगितले आहे. तर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांनाही पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments