अजय कंडेवार,Wani:- यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील वसंत नगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या तत्कालीन ठाणेदाराच्या रायटरने असली नोटाच्या मोबदल्यात चारपट बनावट नोटाचे आमिष दाखवून लुटले होते.तर पुसद शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून नोकरी करणाऱ्यांने जादूटोणा करून फसवणूक केले होते.अशा दोन्हीही पोलीस नाईकाला यवतमाळच्या एसपी ने डिसमिस केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशी सूत्राकडून माहिती मिळाली.
युवराज जाधव व रवी रामचंद्र कपिले असे डिसमिस केलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहेत. प्राप्त माहितीनुसार पुसद वसंत नगर पोलीस ठाण्याच्या हददीमध्ये विजय टॉकीज रोडवर दि.२६ जानेवारी २०२३ रोजीच्या संध्याकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान ४ लाख रुपयांच्या नोटांच्या मोबदल्यात १६ लाख रुपयांच्या नकली नोटांचे आमिष दाखवून लुटले होते.त्या प्रकरणांमध्ये ठाणेदाराचा रायटर असल्याचे उघडकी झाले होते. नागपुरच्या धंतोली येथे राहणाऱ्या संदीप गुप्ताला लुटले होते.त्या प्रकरणी त्यांनी वसंत नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन तक्रारी पोलीस देखील सामील असल्याचा दावा केला होता.तर ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे राहणाऱ्या प्रवीण निवृत्ती शेरकर वय ३९ वर्षे यांना जादू टोणाचे आमिष दाखवून टप्प्याटप्प्याने २३ लाख १४ हजार ५४९ रुपये उकळले होते.त्यात १६ लाख ५० हजार रुपयांचे आरटीजीएस देखील केले होते. एवढी मोठी रक्कम देऊन सुद्धा प्रवीणला काहीही फरक पडला नाही. त्यामुळे त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यामध्ये दि.१० ऑक्टोबर २०२१ रोजी विश्वजीत रामचंद्र कपिले,रवी रामचंद्र कपिले,कैलास रामचंद्र कपिले व सारिका रवी कपिल यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, यवतमाळच्या जिल्हा पोलीस अधीक्षकाने नोकरीवरून काढून टाकल्याने पोलीस वर्तुळात एकच उडाली आहे.