अजय कंडेवार,Wani:- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत सोबत आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह बघून अक्षरशः प्रतिभा धानोरकर यांना अश्रू अनावरण झाले…. अन् जनतेच प्रेम असच राहू द्या अशी भावना देखील व्यक्त केली.congress..
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांचे ता.25 मार्च रोजी प्रथमच आगमन झाले. दुपारी साडेबाराच्या सुमारात नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले तेव्हा शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि चाहत्यांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात जल्लोषात जंगी स्वागत केले. यावेळी ‘प्रतीभाताई आप आगे बढो…. हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. नागपूर विमानतळावर यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे संजय खाडे, देविदास काळे,टिकाराम कोंगरे,प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी आदि काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. chandrapur Loksabha…