Tuesday, September 22, 2026
HomeUncategorizedMurder....रविंद्रने चाकू संतोष यांच्या जांघेत घातला.....

Murder….रविंद्रने चाकू संतोष यांच्या जांघेत घातला…..

Ajay वणी : वडिलोपार्जित संपत्तीच्या वादाने दोन भावांच्या नात्यात अखेर रक्तरंजित वळण घेतले. मंदर येथे सोमवारी रात्री झालेल्या वादात लहान भाऊ रवींद्र बुरडकर याने मोठा भाऊ संतोष बुरडकर याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संतोष यांचा चंद्रपूर येथे उपचार सुरू असताना मध्यरात्री मृत्यू झाला. या घटनेने मंदर परिसरात खळबळ उडाली आहे.

वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरून संतोष आणि रवींद्र या दोघांमध्ये काही काळापासून वाद सुरू होता. हा वाद मिटविण्यासाठी गावातील तंटामुक्ती समितीनेही दोन्ही भावांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वादाची धग कायम राहिली. सोमवारी रात्री सुमारे ८ वाजता पुन्हा संपत्तीच्या कारणावरून दोघांमध्ये वाद पेटला. बाचाबाचीचे रूपांतर झटापटीत झाले आणि संतापाच्या भरात रवींद्रने चाकूने संतोष यांच्या वार केला. यामध्ये चाकू संतोष यांच्या जांघेत लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर संतोष यांना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री सुमारे १२ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी रवींद्र बुरडकर याला अटक केली असून, यापूर्वी दाखल गुन्ह्यात हत्येचे कलम वाढविण्यात आले आहे. ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page