Wednesday, September 23, 2026
HomeUncategorizedजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांचे बाबापूर येथे २०० रक्तपिशव्यांचे टार्गेट .....

जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांचे बाबापूर येथे २०० रक्तपिशव्यांचे टार्गेट …..

Ajay,Wani : वैद्यकीय क्षेत्रात जाणवत असलेली रक्ताची कमतरता लक्षात घेऊन उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या पुढाकाराने बाबापूर येथे २४ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या शिबिरातून २०० पेक्षा अधिक रक्तपिशव्या संकलित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात तसेच चंद्रपूर परिसरात रक्तसंकलनासाठी सातत्याने तत्पर राहणारे संजय निखाडे यांना चंद्रपूर येथील रक्तपेढीच्या डॉक्टरांकडून रक्तसाठा अपुरा पडत असल्याची माहिती मिळाली. ही बाब समोर येताच कोणताही विलंब न करता गणेशोत्सवाच्या काळात बाबापूर येथे रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

बाबापूर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी होणाऱ्या या शिबिरात गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन संजय निकाळे यांनी केले आहे. २०० रक्तपिशव्यांचा टप्पा ओलांडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या सामाजिक उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page