Ajay Kandewar,Wani:- विधानसभा राजकारण रंगले आहे. प्रचारासाठी आता अवघा आठवडा उरला आहे. सभा, बैठका आणि मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. शिवसेना उमेदवार संजय देरकर यांच्या पत्नी किरणताई देरकर व यांची चमू या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. सध्या त्या वणी विधानसभा क्षेत्रातील वणी शहर व ग्रामीण भागात गावसभा घेत देरकर यांच्या विजयासाठी आवाहन करीत आहे.
किरण ताई या त्यांच्या सहकारी महिलांसह रोज प्रचार करीत आहे. कधी वणी शहर तर कधी ग्रामीण भागाचा त्यांचा दौरा असतो. त्यांची जबरदस्त महिलांची ॲक्टीव चूम आहे. या प्रचारात पदयात्रा, बैठका, कॉर्नरसभा तसेच गृहभेटींचा समावेश आहे. ही चमू घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात. महिला थेट भेटीला येत असल्याने गावकरी महिला देखील या चमुशी मुक्तपणे संवाद साधत आहे आहे.
यावेळी महिला चमू,काँग्रेसचे नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते.