Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsरस्त्याचा कामाची गती वाढवा,अन्यथा आंदोलन - संजय खाडे

रस्त्याचा कामाची गती वाढवा,अन्यथा आंदोलन – संजय खाडे

•वेकोलि अधिका-याचा दालनात चर्चा. •गावकरीही आक्रामक भूमिकेत 

अजय कंडेवार,वणी- वेकोलिने डम्पिंग टाकल्यामुळे उकणी-वणी हा मार्ग बंद झाला. त्यामुळे वेकोलिने दुसरा पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम सुरु केले. मात्र हे काम संथगतीने सुरु आहे. त्याचा फटका उकणीवासीयांना बसत आहे त्यामु़ळे शनिवारी 11 मे रोजी संजय खाडे यांनी वेकोलि अधिका-यांची भेट घेत चर्चा केली त्यात संथगतीने सुरु असलेले काम हे तात्काळ पूर्ण करा अन्यथा गावकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात येइल असा इशारा कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी दिला.

पाऊस आल्यावर या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असून यात चारचाकी वाहने फसत आहेत. ही वाहने बाहेर काढण्यात चालकांना चांगलीच कसरत करावी लागते व इतर लोकांची मदत घ्यावी लागते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राला सुरुवात होते. या नक्षत्रापासून पावसाला सुरुवात होते. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने हे काम येत्या एक महिन्यात पूर्ण होणे अशक्य वाटत आहे. त्यामुळे वेकोलिने वेळेत काम पूर्ण करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, संदीप कांबळे, बंडू खिरटकर, राजू चिंचोलकर , रोशन देरकर , जीवन मजगवळी , किसन पारशिवे, मनोज खाडे , निलेश हिरादेवे , स्वप्नील गोवारदिपे, अजय खाडे यांच्यासह उकणी येथील रहिवासी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments