अजय कंडेवार,वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने (CBSE ) दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. वणी शहरातील ‘मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी शाळेने’ यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेत शाळेतील एकूण 47 विद्यार्थी बसले होते.त्यात सनाया महेंद्र कठाने हिने दहावीत ८९ टक्के गुण प्राप्त करत अव्वल येण्याचा मान पटकावला.Macaroon school continues its tradition of 100% awesome result.
नुकताच केंद्रीय शिक्षण मंडळाने (CBSE ) दि.13 मे सोमवार रोजी दहावी व बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. यामध्ये शहरातील नेहमीच शिक्षणक्षेत्रात अव्वल मानलें जाणारी सुप्रसिद्ध मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी या शाळेचा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.संबंधित परिस्थिती लक्षात घेऊन सी.बी.एस ई. नी आखुन दिलेल्या नियमानुसार मॅकरुन स्टुडन्टस अकॅडमी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली दरवर्षी ची 100% निकालाची परंपरा कायम ठेवित अतुल्य यश मिळवून विद्यार्थ्यांनी शाळेच्या व आपल्या पालकांच्या सन्मानात मोलाची भर घातली आहे. यामध्ये प्रथम सनया महेंद्र कठाने ८९% , द्वितीय विजेता विश्वास शेळकी ८८, तृतीय तनिषा शैलेंद्र लाल ८७% व गौरव ढूमने ८७% , सारांश कुशवाह ८६%, अपूर्वा पावडे ८३%तन्वी आशतकर ८२%, प्रतिक्षा चंदनखेडे ८१%,, समिक्षा मोहीतकर ८०%, विदिशा भगत ७९%,तनिषा सरवर ७६%, वैभव डोंगे ७६%या सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण प्राप्त करून यश संपादन केले.
मॅकरुन स्टुडंन्टस अकॅडमीच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे या यशाने सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय शाळेचे संचालक पी.एस.आंबटकर, उपसंचालक पियूष आंबटकर ,उत्कृष्ट मुख्यद्यापिका शोभना मॅम तसेच शिक्षकवृदांना दिले .तसेच प्राचार्य शोभना मॅडम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या..