Friday, November 27, 2026
HomeBreakingकोंबड बाजार शौकिनांचा "बीट वाल्यांनाच" ठेंगा..!

कोंबड बाजार शौकिनांचा “बीट वाल्यांनाच” ठेंगा..!

Ajay Kandewar,Wani : वणी परिसरातील रासा शिवारात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) धाड पथकाने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत कोंबड बाजार खेळणाऱ्या चार इसमांसह सहा दुचाकी वाहने आणि जखमी कोंबडे ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध कोंबड बाजारांच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवर अशा बाजारांना कोणाचे अभय आहे, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

वणी परिसरातील केसुर्लि जंगल, रासा शिवार आणि इतर निर्जन ठिकाणी अशा प्रकारचे छोटे-मोठे कोंबड बाजार भरत असल्याची चर्चा आहे. बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशा ठरावीक दिवशी शौकिनांची गर्दी जमते आणि मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होत असल्याची माहिती चर्चेत आहे. काही गावपुढाऱ्यांच्या पुढाकाराने किंवा त्यांच्या कथित आशीर्वादाने हे प्रकार सुरू असल्याचीही चर्चा असून, या दाव्यांची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे. स्थानिक पोलिसांच्या नजरेसमोर हे प्रकार सुरू आहेत की त्यांना याची माहितीच नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

LCB च्या कारवाईने स्थानिक यंत्रणेला आरसा

विशेष म्हणजे, रासा बीटच्या हद्दीत अशा प्रकारचे बाजार भरत असल्याची चर्चा असताना स्थानिक बीट यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक पातळीवर कारवाई का झाली नाही? नियमित गस्त आणि गोपनीय माहिती संकलन नेमके कुठे कमी पडले? या प्रश्नांची उत्तरे पोलीस प्रशासनाने देण्याची गरज आहे. LCB पथकाच्या कारवाईमुळे अशा अवैध बाजारांवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page