अजय कंडेवार,वणी:- अवैद्य धंदे विरुद्द वणी पोलिसांनी शहरात धाडसत्र राबवून ६ ठिकाणी मटका जुगार खेळवताना ९ जणांना अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून ९८ हजार ६१० रुपयांचा रोख व मुद्देमाल जप्त केला. उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी यांचे आदेशानुसार पोलीस पथकाने ९ में रोजी सायंकाळपासून तर १० में रोजी सायंकाळपर्यंत शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर तसेच अवैध दारू चा अड्यावर धाड टाकली.
पोलीस स्टेशन वणी परिसरातील सर्व प्रकारचे अवैद्य धंदे विरुद्ध पोलीस निरीक्षक अनिल बेहेराणी ठाणेदार पोलीस स्टेशन वणी यांनी सर्व अधिकारी, गुन्हे शोध पथक व सर्व बिट अंमलदार यांना सक्त आदेशीत करून कडक कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले.त्याअनुषंगाने वणी परिसरातील अवैद्य व्यवसायांवर खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली.
१) शाम टॉकीज वणी परिसरात ज्योती बारचे बाजुला अवैद्य वरली मटका व्यवसायावर रेड टाकुन आरोपीत इसम नामे १) सैयद इरफान सैयद ताज वय ४० वर्षे रा. मोमीनपुरा वणी २) शेख सोहेल शेख सलीम वय २८ वर्षे रा. पंचशील नगर वणी या नमुद आरोपीत इसमांकडुन वरली मटका साहीत्य, मोबाईल व नगदी असा एकुण ५८,७६०/- रू. मुद्येमाल मिळुन आला तसेच सदर इसमां विरूद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम १०९ भारतीय दंड विधाण अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी फरार दाखविण्यात आले आहे.२) दिपक चौपाटी परिसरात नगर परिषद कॉम्प्लेक्सचे मागे अवैद्य वरली मटका व्यवसायावर रेड टाकुन आरोपीत इसम नामे १) आसीफ खान जमाल खान वय ४९ वर्षे रा. शास्त्रीनगर वणी २) रोहीत माणीक तावाडे वय २४ वर्षे रा. दामले फैल वणी ३) राकेश अशोक वानखडे वय ३० वर्षे रा. जुना लालगुडा वणी या नमुद आरोपीत इसमाकडुन वरली मटका साहीत्य, मोबाईल व नगदी असा एकुण ३५,१००/- रू. मुहद्येमाल मिळुन आला तसेच सदर आरोपीत इसमांनी नमुद व्यवसाय हा ४) शंकर गणपत धंदरे वय ६० वर्षे रा. प्रेमनगर वणी यांचे मालकीचा असल्याचे सांगीतले वरून नमुद आरोपीत इसमी विरूद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम १०९ भारतीय दंड विधाण अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातही मुख्य आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले.३) भाजी मंडई परिसरात ज्योती बारचे बाजुला अवैद्य वरली मटका व्यवसायावर रेड टाकुन इसम नामे मुकेश सुभाष लोहकरे वय ३२ वर्षे रा. सम्राट अशोक नगर वणी याचे जवळुन वरली मटका साहीत्य व नगदी २१२०/-रु. मिळुन आले तसेच सदर आरोपीत इसमां विरूद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम १०९ भारतीय दंड विधाण अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.४) भाजी मंडई परिसरात अवैद्य वरली मटका व्यवसायावर रेड टाकुन आरोपीत इसम नामे दानीश सैयद तनवीर वय २१ वर्षे रा. शास्त्रीनगर वणी याचे जवळुन वरली मटका साहीत्य व नगदी ५७०/- रु. वरून नमुद आरोपीत इसमां विरूद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.५) सिंधी कॉलणी वणी परिसरात अवैद्य वरली मटका व्यवसायावर रेड टाकुन आरोपीत इसम नामे रोहीत किशोर रापुसीया वय २४ वर्षे रा. तेलीफैल वणी याचे जवळुन वरली मटका साहीत्य व नगदी ५२०/-रु. वरून नमुद आरोपीत इसमां विरूद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.६) डॉ. आंबेडकर चौक वणी परिसरात अवैद्यरित्या विनापरवाना विदेशी दारू घेवुन जात असतांना आरोपीत इसमांवर रेड टाकुन आरोपीत इसम नामे शमशेरसिंग शंभुप्रसाद पटेल वय ३५ वर्षे रा. नंदीनी बार जवळ वणी याचे जवळुन आयकॉनीक व्हाईट कंपणीचे १८० एम.एल चे १२ बॉटल्स् किंमत १७०/रु दर प्रमाणे एकुण २०४० /- रु. चा मुझेमाल मिळून आला वरून नमुद आरोपीत इसमा विरूद्ध कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही Dysp गणेश किन्द्रे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पो.नि अनिल बेहेराणी तसेच ए.पी.आय दत्ता पेंडकर, पोलीस अंमलदार विकास धडसे, सुनील नलगंटीवार, मिथुन राउत, पुरूषोत्तम डडमल, लोकेश मसराम, शंकर चौधरी, विजय गुजर,भानुदास हेपट व प्रफुल नाईक यांनी पार पाडली आहे.
(अवैध धंदेविरुद्ध सतत कारवाई माहे फेब्रुवारी २०२४ ते माहे में २०२४ पर्यंत)
” माहे फेब्रुवारी ते माहे में पर्यंत वणी पोलीसांनी केलेल्या कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये ५१ गुन्ह्याची नोंद तर कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम १०९ भारतीय दंड अन्वये ७३ गुन्हाची नोंद वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे तर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आले.”
“एका इसमाने आमदार बोदकुरवार यांना फोन करून अवैध धंदेबाबत माहिती देताच आमदाराने पोलीस ताफ्यासह शहरातील अवैध मटक्यावर धाड टाकल्याची घटना ९ मे रोजी घडली. त्यावेळी वरली मटका संचालकांनी तिथून पळ काढला.शहरात मागील काही महिन्या पासून चोरी, घरफोडी, दरोडा व खूनासारख्या घटना घडत असताना एकही आरोपी पोलिसांनी पकडले नाही. मटका, जुगार, रेती तस्करी वाढलेली आहे. या वाढलेल्या धंद्यांना पोलिसच जबाबदार आहे ” :- आमदार बोदकूरवार(वणी विधानसभा क्षेत्र).