Sunday, November 29, 2026
HomeBreakingरासा कोंबड बाजारातील चार इसमांची नावे आली समोर....

रासा कोंबड बाजारातील चार इसमांची नावे आली समोर….

Ajay,वणी : तालुक्यातील रासा शिवारातील कोंबड बाजारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर या बाजारात सहभागी असलेल्या चौघांची नावे आता समोर आली आहेत. या प्रकरणात सतीश गुलाबराव गवळी (वय ५२, रा. गोधणी, ता. मारेगाव), वैभव गजानन काकडे (वय ३८, रा. घोन्सा, ता. वणी), हेमंत मारोती पावडे (वय २१, रा. सुसरी, ता. झरी-जामणी) आणि सूरज आनंदराव दुर्गे (वय ३२, रा. रासा, ता. वणी) यांची नावे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाली आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(ब) अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईत तीन कोंबडे, सहा दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख २८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत १ हजार ६०० रुपये रोख, अंदाजे १ हजार ५०० रुपये किमतीचे तीन कोंबडे आणि अंदाजे २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त दुचाकींमध्ये MH-29-AQ-9199, MH-34-BT-6856 आणि MH-29-BL-4108 या क्रमांकांच्या वाहनांचा उल्लेख आहे. याशिवाय इतर काही फरार इसमांचाही या प्रकरणात शोध सुरू असल्याचे कळते. ही कारवाई LCB वणी पथकांनी केली.

Box..

बीट जमादारांना ठेंगा, बीट अधिकाऱ्यांनाही जुमानेनात?

रासा शिवारात कोंबड बाजार भरत असल्याची चर्चा असताना आता या प्रकरणातील सहभागींची नावे समोर आल्याने स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. बीट जमादार आणि बीट अधिकाऱ्यांच्या हद्दीत असे प्रकार सुरू असल्यास त्याची माहिती स्थानिक यंत्रणेला का मिळाली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. केसुर्लि जंगलासह वणी परिसरातील इतर संशयित ठिकाणीही अशा प्रकारचे बाजार भरत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यापक तपास करण्याची गरज आहे. LCB च्या या कारवाईनंतर आता या कथित कोंबड बाजारामागे आणखी कोणाचे हात आहेत आणि फरार इसम कोण आहेत, हे तपासातून समोर येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page