अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील सर्वात मोठा गाव समजला जाणारा राजूर. येथे आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. यामध्ये परीसरातील शेकडो रुग्ण सेवेचा वापर घेतात. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी राहते. परंतु येथील दोन्ही वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी हजर राहत नसल्याने याचा परीणाम रुग्णसेवेवर होत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी यांना मुख्यालयी हजर राहण्याची मागील अनेक वर्षांपासून ॲलर्जी दिसून येत आहे. कोणीही लक्ष न देण्याचा फायदा या दोन अधिकाऱ्यांना होतांना दिसत आहे. कारण तालुका अधिकारी यांनी पावसाळ्यापूर्वीच मुख्यालयीन पत्र दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे तरीही हे अधिकारी नियमाची पायमल्ली करतांना दिसत आहे.Rajur village medical officers do “up-down”.
आता पावसाळ्याचे दिवस असल्याने येथे रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र येथे वैद्यकीय अधिकारी दोन असूनही रात्रीला येथे कोणीही हजर नसल्याने रुग्णांना याचा त्रास होतो. येथील वैद्यकीय अधिकारी शासनाने दिलेला मुख्यालयीन आदेशाला व वरिष्ठांच्या लावलेल्या काहीं नियमांची पायमल्ली करुन स्वतःचे घोडे हाणन्याचे काम करीत असल्याचा आरोप होत आहे. शासनाने त्यांना मुख्यालयी राहण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन राहण्याची सोय करुन दिली मात्र येथे वैद्यकीय अधिकारी रात्रीला कोणीही हजर नसतो. त्यामुळे येथे रात्री अपरात्री येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहे.
रुग्णकल्याण समितीच्या व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे येथील निवासस्थाने शोभेची वास्तु बनली आहे. वैद्यकीय अधिकारी दोन असूनही दोनपैकी एकही रात्र पाळीला हजर राहत नाहीत. एखादा गंभीर रुग्ण जर रात्री पी.एच.सी. येथे हजर नसल्यामुळे अनुचित प्रकार घडू शकतो. असा हा यांचा गौडबंगाल मागील अनेक वर्षापासुन सुरु आहे याला खत पाणी देण्याचे काम वरिष्ठ करीत असल्यानं या अधिकाऱ्याला पाठबळ मिळत असल्याचेही जनतेतून ओरड आहे. या वैद्यकिय अधिकाऱ्यांना घर भत्ता 5000 ते 7000 हजार मिळतो. मागील 3 वर्षाहून अधिक झाले आहे याचा उपभोग देखिल हे करतात आणि शासनाचा तिजोरीला चुना लावीत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे
• कर्मचारी करतात अपडाऊन –
वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे दररोज अप-डाऊन करीत आहेत. पावसाळ्याचे दिवस रुग्णाची गर्दी पाहूनही एकही अधिकारी हा मुख्यालयी उपस्थित राहत नाहीत याकळे डी.एच.ओ. व संबधित अधिकारी यांनी लक्ष देतील का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. डी.एच.ओ यांना सर्व अधिकार असतांनाही कानडोळा का करताहेत ? हे कोडच आहे. या वैद्यकिय अधिकाऱ्यांना आवर घालणे गरजेचे आहे. विशेषतः हे दोन्ही वैद्यकीय अधिकारी स्वतः रूग्णांना काळजीपूर्वक तपासणी देखील करीत नसल्याने बरेचशे आरोप गावात होत आहे.म्हणून नाईलाजास्तव गावातील रुग्ण वणी ग्रामीण रुग्णालयात धाव घेताना दिसत आहे . या अधिकाऱ्यांना अवाढव्य पगार असतांना देखिल गरिबांसाठी वरदान ठरत असलेले पी एच सी यातही गैरसोय होतांना स्पष्ट दिसून येत आहे. याला कारणीभूत माञ हेच दोन वैद्यकीय अधिकारी आहे.
“शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांना आदेशीत केले आहे. समस्त M.O यांनी पी.एच सी.ला फिल्डवर उपस्थित राहावे असे आदेश लेखी स्वरूपातही सूचना दिल्या आहेत. माझ्याकडे आजपर्यंत एकही तक्रार आलेली नाही तरी असे आढळल्यास त्यावर टी. एच.ओ कडून माहिती घेऊन या संदर्भाची दखल घेऊन चौकशी करण्यात येईल- प्रल्हाद चौहान ,डी.एच.ओ. यवतमाळ .
“मला तालुक्याचे काम पाहण्याची जबाबदारी दिली आहे. तरी या सदर प्रकरणाची वरिष्ठांना कळविण्यात येईल व याबाबत चौकशी करण्यात येईल. कायर,शिरपूर, कोलगाव,राजूर येथील सर्व M.O यांना पावसाळ्यापूर्वीच मुख्यालयीन राहण्याचे पत्र दिलेले आहे. परंतु राजूर पी.एच.सी येथील M.O का राहत नसतील त्याबाबत माहिती घेण्यात येईल परंतु शासन नियमानुसर मुख्यालयी राहणे हे अनिवार्य आहे .- समिर थेरे, टी.एच.ओ.वणी.”