अजय कंडेवार,Wani:- शहरातील सेवानगर येथील रंगारीपूरा जवळ असलेली नदी पात्रावरील काटेरी झाडे तोडण्याकरीता विनोद मोहितकर यांचा नेतृत्वात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमूख ललित लांजेवार यांनी वणी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदनातून साकडे घातले.Immediately cut thorn bushes near the riverbed.
निर्गुडा नदी पात्राजवळ मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वसलेली आहे आणि काटेरी झुडुप हे अतिशय घनदाट वाढलेली आहे.त्यामूळे काटेरी झाडे तोडणे अत्यंत गरजेचे झाले. या काटेरी झाडामुळे अतिशय दाट झुडूप निर्माण झाले आहे व त्यात साप,विंचू व अन्य प्राण्याचा जमाव देखिल झाला आहे. तसेच तिथे लोकांचे येणे-जाणे सुरू राहते असते . या झुडूपामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात परिसरातील जीवितहानी होणे यात दाट शक्यता आहे. त्याकरिता प्रशासनाने त्याकडे जातीने लक्ष देऊन पात्राजवळील काटेरी झाडे तोडावे अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना महेश कुचेवार, सुनील डोंगरे,जीवन गोवारदिपे, संदेश भोयर,सुनील डोंगरे, रामप्रसाद क्षीरसागर,संजू तोमसकर आदि उपस्थित होते.