अजय कंडेवार-Wani:- लाभार्थ्यांच्या नावाने पाच ब्रास रेतीची नोंद असून त्यांना फक्त २ ब्रास रेती दिली जात आहे असा घणाघाती आरोप करीत तसेच घरकुल लाभार्थ्यांचे थकीत अनुदान त्वरित देणे व बांधकामास तात्काळ रेती उपलब्ध करून देण्याकरीता वणी मनसे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी SDO यांना निवेदनातून मागणी केली आहे.Ouch…! Gharkul beneficiaries will be given two brass instead of five brass.
तालुक्यात रमाई, पंतप्रधान, व शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. या योजनेअंतर्गत त्यांना घरकुल बांधण्याकरिता पहिला व दुसरा टप्पा अनुदानाचा वितरित करण्यात आला तर कुठे कुठे पहिल्या टप्प्यावरच काम थांबलेले आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्याने कामे पूर्णतः ठप्प आहेत. सद्यस्थितीत पावसाचे दिवस असून बांधकाम विभागामुळे या लाभार्थ्यांना उघड्यावर आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. परिणामी मोठा मानसिक त्रास लाभार्थ्यांना होत आहे.तसेच लाभार्थ्यांच्या नावाने पाच ब्रास रेतीची नोंद असून त्यांना फक्त २ ब्रास रेती दिली जात आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावाजवळील डेपो वरूनच रेती देण्यात यावी जेणेकरून लाभार्थाचा खर्च वाचेल. ज्या रेती डेपो वाल्यांनी लाभार्थ्यांची फसवणूक करून पाच ब्रास च्या ऐवजी दोन ब्रास रेती दिली आहे. अश्या डेपो धारकांवर त्वरित कारवाई करावी. तसेच लाभार्थ्यांना जवळील डेपो मधून रेती द्यायचे आदेश देण्यात यावे.
येत्या आठ दिवसात घरकुल योजनेचे उर्वरित अनुदान तसेच लाभार्थ्यांना जवळील डेपो वरून रेती उपलब्ध करून न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्यासाठी स्वतः जबाबदार राहाल असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी फाल्गुन गोहोकार ,धिरज पिदुरकर,राकेश शंकावार,रनजित बोंडे,विलन बोदाडकर,आकाश काकडे,प्रविण कठसकर,योगेश काळे,सुरज काकडे,गजानन कोंडकार,धिरज बागवा दिलीप पेचे,गणेश खामनकर,शांताबाई काळे,गणेश करमणकर,गिता बुरडकर,संगिता चिंचोलकर,बंडू पुंड व सतिश काकडे आदि उपस्थित होते.