अजय कंडेवार,Wani:- यवतमाळ जिल्ह्याचे रा.श.प गटाचे जिल्हाध्यक्ष विजय नगराळे व त्यांचा सहचरणीने एका पोस्ट चा माध्यमातून काहीं व्यथा दादांकडे मांडली आहे आणि ती चांगलीच व्हायरल देखिल होतांना दिसत आहे .
‘‘प्रिय दादा, नमस्कार. ‘लाडकी बहीण’ योजनेची माहिती वाचली. खूप विचार करून हे पत्र पाठवीत आहे. दादा, याचा लाभ घ्यावा असे मला वाटत नाही. याच कारण नेमके वाचून घ्या हो दादा….
हेच ती “व्यथा” नक्कीच आवर्जून वाचा….
” दादा तू सुरू केलीली लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तू महिना 1500/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला नको.कारण तुझा भाऊजी याबाबत सक्षम आहे परंतु तुझ्या ढसाळ नियोजनाने आज माझा घरची परिस्थीती ढासळली आहे.त्या ऐवजी तू … गॅस चे दर कमी कर, विजेचे दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, ट्रॅफिक ची समस्या सोडण्याचा प्रयत्न कर, रुग्णालयांच्या मधे कमी खर्चात सर्वांना एकसमान सुविधा निर्माण कर, पेट्रोल डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी कर, शाळेची वारेमाप वाढलेली फी, काही शाळांची मग्रुरी, मनमानी बंद कर, सर्वांना स्वस्तात उत्तम शिक्षण मिळेल ह्याची व्यवस्था कर, उच्च शिक्षण स्वस्त कर, महाविद्यालयांची वाढलेली फी कमी कर, जेणे करून भाचे मंडळी कमी खर्चात डॉक्टर इंजिनीयर होऊ शकतील, ट्रेन लां होणाऱ्या गर्दी वर काही तरी कर, तुझ्या भाचे आणि भाच्यासाठी नोकरी रोजगार उपलब्ध कर, महाराष्ट्रातून परराज्यात जाणारे उद्योग धंदे थांबव … जेणकरून तुझ्या भाऊजीना पैशाची चणचण लागणार नाही, त्यांचे आरोग्य सुखरूप राहील, प्रवासात जीव टांगणीला लागून प्रवास होणार नाही आणि त्यांच्या कमी पगारात, कमाईत पण तुझी बहीण सुखी राहील आणि तुझ्या भाऊजी मला आनंदित ठेवेल.
दादा.. तूझ्या बहीणीला 1500 रु खरंच नको देऊ. पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यासाठी महागाई नक्कीच कमी कर …. तेव्हा साहजिकच 1500 पेक्षा जास्त मी जमा करु शकेल आणि त्यात तुला देण्याची गरजही भासणार नाही माझा आवडत्या भावा…
तूझी लाडकी बहीण व भाऊजी
🙏🙏🙏