Friday, April 24, 2026
HomeBreaking Newsवणीत पहिल्यांदाच निघणार "No बॅनर..... No झेंडे" हातात फक्त "तिरंगा" अशी रॅली.......

वणीत पहिल्यांदाच निघणार “No बॅनर….. No झेंडे” हातात फक्त “तिरंगा” अशी रॅली…….

Ajay kandewar,Wani: स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवसाचा अगोदर देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीय नागरिकांचा मनामध्ये जागृत करण्यासाठी तसेच नव्या भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी लोकांमध्ये उत्साहाची भावना निर्माण व्हावी,यासाठी तालुक्यातील वणी शहरात पहिल्यांदाच कोणत्याही राजकीय पक्षाचे “No बॅनर अथवा No झेंडे ”  घेत फक्त वणीकर नागरिक (भारतीय) म्हणून (ता.14 ) रोजी सकाळी ठीक 9 वाजता विश्रामगृहापासून “भव्य तिरंगा” रॅलीत तिरंगा हातात घेऊन (पदयात्रा) काढण्यात येणार आहे.

या तिरंगा पदयात्रेत शहरातील सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक संघटनाचाही सहभाग असणार आहे. त्याकरिता तालुक्यातील नागरीकांनी व संस्थांनी सहभागी होण्याचे आव्हान देशभक्त म्हणून करीत आहे.

असा असेल रॅलीचा मार्ग : 

सुरुवात वणी विश्रामगृह पासून •छत्रपती शिवाजी महाराज चौक, •खाती चौक, •महात्मा गांधी चौक, •गाडगे बाबा चौक, •काठेड ऑईल मिल चौक, •सर्वोदय चौक, •रविंद्रनाथ टागोर चौक, •डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तर समापन लोकमान्य टिळक चौक असा असेल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page