अजय कंडेवार,Wani:- जिल्हा खनीजकर्म विभागांतर्गत जमा असलेल्या खनीज विकास निधीतून वणी तालुक्यातील मोहदा ग्रामपंचायतीला व मारेगाव तालुक्यांतील नरसाळा गावात विविध विकासकामे करण्यासाठी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतुन तालुक्यातील 2 गावांमध्ये विविध विकासकामे केली जाणार आहेत. त्यात महत्वाचे म्हणजे मोहदा ग्रामपंचायत सरपंच वर्षा राजूरकर व उपसरपंच सचिन रासेकर यांच्या कार्यकाळात मोहदा ग्रामपंचायतीनें गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला होता अखेर मा.आ .बोदकुरवार यांचा विशेष प्रयत्नाने मोहदा ग्रामपंचायतला जवळपास ३० वर्षानंतर ३० लाखांचा खनिज विकास निधी मंजूर झाला आहे. परंतु मोहदा गाव खाण बाधित शेत्र असल्यामुळे विकासासाठी नियमानुसार ४० कोटी रुपयांची मागणीही करण्यात आली आहे.
तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या क्षेत्रावर गौण खनिजाचे उत्खनन केल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाला मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होतो. जिल्हाधिकारी कार्यालयाने एकूण उत्पादनाच्या काही भाग संबंधित ग्रामपंचायतीमार्फत गावाच्या विकासासाठी देण्यासाठी पुढाकार घेतला.वणी,मारेगाव तालुक्यातील मोहदा व नरसाळा या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गौण खनिजाचे उत्खनन करण्यात येते. या बदल्यात कोट्यवधी रुपये महसूल जमा होतो . यापैकी काही रक्कम ग्रामपंचायतीला मिळणार असल्याने ग्रामपंचायतींनी गावातील महत्त्वाची व अति महत्त्वाच्या कामाची यादी करून या कामाचे ठराव घेऊन आमदार संजिवरेडी बोदकुरवार यांच्या प्रयत्नामुळे मोहदा या ग्रामपंचायतींना विकासकामासाठी एकूण ३०लाख रुपयांचा खनिज निधी मंजूर करण्यात आला आहे.
याबाबतीत महत्वाचे म्हणजे मोहदा ग्रामपंचायत सरपंच राजूरकर व उपसरपंच सचिन रासेकर यांच्या कार्यकाळात मोहदा ग्रामपंचायतीनें गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला होता. अखेर मोहदा ग्रामपंचायतला जवळपास ३० वर्षानंतर ३० लाखांचा खनिज विकास निधी मंजूर झाला आहे.परंतु विकासासाठी नियमानुसार ४० कोटी रुपयांची मागणीही करण्यात आली आहे. या ३० लाखाचा कामात मोहदा येथे सार्वजनीक वाचनालय इमारत बांधकाम करणे (१५ x २०’, शौचालय, पाणी व विद्युत व्यवस्था)१०.०० लक्ष.२) मोहदा येथे क्रीडांगण (वॉल कंपाउंड, कबड्डी, व्हालीबॉल, क्रीकेट ग्राउंड व रनिंग धावपट्टी तयार करणे) ३) मोहदा येथे अंगणवाडी बांधकाम १०.०० लक्ष.(हाल२०’ x ३०, शौचालय, पाणी व विद्युत व्यवस्था) १०.०० लक्ष. अश्या विविध कामाबाबत ३० लाखाचे वर्गीकरण केले आहे. या येणाऱ्या खनिज विकास निधीमुळे मोहदा गावचा विकासाला गती प्राप्त होणार यात शंका नाहीं. ग्रा. पं मोहदा सरपंच उपसरपंच यांनी केलेल्या पाठपुरव्याबाबत जनतेतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.